Tuesday 13 January 2015

जागृती वाहिनीचे मुंबई ब्युरो चीफ म्हणून शशिकांत सांडभोर रुजू

महाराष्ट्रात नव्यानेच सुरु झालेल्या "जागृती" मराठी न्यूज च्यानेलचे मुंबई ब्युरो चीफ म्हणून सामाजिक चळवळीची जाण असलेले धडाडीचे पत्रकार शशिकांत सांडभोर यांची नियुक्ती झाली आहे. सांडभोर हे नुकतेच आपल्या पदावर रुजू झाले आहेत.

मुंबईच्या सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून सांडभोर यांनी शांतीवन आणि आनंदवनच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटे, सकाळ, सांज दिनांक मुळे सांडभोर पत्रकारितेत आले. त्यांनी १९९९ पासून सीटीव्ही, च्यानेल 7, टीव्ही 9, व्हाईस ऑफ इंडिया, न्यूज एक्सप्रेस मधून या आधी काम केले आहे. टीव्ही जर्नालिस्टस असोसिएशनचे अध्यक्षपद सांडभोर यांनी भूषवले असून सध्या ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.