Tuesday 27 January 2015

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी (२६ जानेवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

आर. के. लक्ष्मण याचं 'कॉमन मॅन' हे व्यंगचित्र चांगलंच गाजले. फ्री प्रेस जर्नल्सपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर अर्धशतकभर 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत राहिली. आर. के. लक्ष्मण यांना आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि मॅगसेसे पुरस्कारांनी त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला होता. घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे कायमच चर्चेत राहिली. कॉमन मॅन घडविणारा व्यंगचित्रकार हरपल्याने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ या दिवशी म्हैसूरमध्ये झाला. सूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन. लहानपणापासूनच व्यंगचित्रांची आवड. त्यानंतर फ्री प्रेस जनर्ल्समध्ये पूर्णवेळ पहिली नोकरी. येथेच बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्याशी मैत्री झाली. फ्री प्रेसची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी अर्धशतकभर 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्रे रेखाटली. त्यांचे 'कॉमन मॅन' हे व्यंगचित्र बरेच गाजले. आर. के. लक्ष्मण यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे अचूक भान होते. हेच भान त्यांच्या कॉमन मॅन' मधून व्यक्त होते.

आर. के लक्ष्मण यांना मिळालेले पुस्कार
लक्ष्मण यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांत पद्मभूषण(१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे पुरस्कार(१९८४) आदी महत्त्वाचे पुरस्कार आहेत. मराठा विद्यापिठाने त्यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी दिली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.

आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
आयडल अवर्स
आर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८
द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह)
द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा)
अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे)
दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)
फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह)
बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके)
द मेसेंजर (कादंबरी -१९९३)
अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे)
द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
serk