Wednesday 7 January 2015

मानखुर्द येथे पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मुंबई क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार, ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील पीएमजी कॉलनी मानखुर्द येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र दामुगडे यांनी दिवंगत पत्रकारांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. पुढे बोलताना राज्यातील सर्व पत्रकारांनी आपापसात कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा हेवेदावे न ठेवता देशाच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. तसेच पत्रकारांसाठी संरक्षण कायदा तत्काळ अमलात आणण्यासाठी सरकारकडे मागणी करण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकारांनी सामाजिक, सांस्कृतिक किंवा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा व कर्तव्याचा ठसा उमटवावा व खर्‍या अर्थाने देशसेवेत सहभागी व्हावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव हरेश खारकर यांनी केले.