Monday 2 February 2015

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

मुंबई - मंत्रालयामध्ये मोजक्या प्रस्तापीत पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या" सन 2015 साठी पार पडलेल्या निवडणूकीत अध्यक्ष पदी दैनिक पुढारीचे चंदन शिरवाळे,  ऊपाध्यक्ष पदी दै. मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे, कार्यवाहपदी दिव्य मराठीचे चंद्रकांत शिंदे तर कोषाध्यक्ष पदी पीटीआयच्या मनिषा रेगे निवडून आले आहेत. 

मंत्रालय  आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची वार्षिक निवडणूक विधानभवन पत्रकार कक्ष येथे (३१ जानेवारी) पार पडली. या निवडणूकीत अध्यक्ष व ऊपाध्यक्षपदाच्या एका जागेसाठी प्रत्येकी तीन तर कार्यकारीणी सदस्य पदाच्या पाच जागेसाठी एकूण सहा ऊमेदवार निवडणूक रिंगणात होते.
वार्ताहर संघाच्या 102 सदस्यांनी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाअंती अध्यक्षपदासाठी चंदन शिरवाळे  सर्वाधिक 47मते मिळवून निवडून आले, त्यांचे प्रतिस्पर्धी अनिकेत जोशी यांना43 तर सदानंद खोपकर यांना नऊ मते मिळाली. ऊपाध्यक्ष पदासाठी प्रमोद डोईफोडे यांना सर्वाधिक 59 मते मिळल्याने ते निवडून आले त्यांचे प्रतिस्पर्धी दीलीप जाधव 27 मते मिळवून दुस-या आणि किशोर आपटे 16 मते मिळवून तिस-या क्रमांकावर राहीले. कार्यकारीणी सदस्य पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत खंडूराज गायकवाड (दैनिक जनप्रवासयांना  प्रथम क्रमांकाची 74 मते मिळाली तर राजू झनके (दैनिक जनतेचा महानायक ) 73 मते मिळवून निवडून आले. 

अन्य तीन सदस्यांमध्ये प्रवीण राऊत (नागपूर तरूण भारत) 66 मते, अनिल तिवारी (दोपहर का सामना) 62 मते आणि सुरेंद्र मिश्रा(अमर ऊजाला) 60मते मिळवून निवडून आले, या पदासाठी महेश पावसकर यांना 59 मते मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. सदर निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून विवेक भावसार यांनी काम पाहीले.