Monday 2 February 2015

राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी पद्माकर देशपांडे यांची, तर कार्याध्यक्षपदी हेमंत चंद्रात्रे यांची निवड झाल्याचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी जाहीर केले आहे.

नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष सुरेश पवार, खजिनदार संदीपकुमार ब्रह्मेचा, सरचिटणीस विकास देशपांडे, जिल्हासंघटक गिरीश होशिंग, चिटणीस तुषार बर्डे, कार्यकारिणी पदाधिकारी म्हणून योगेश गांगुर्डे, योगेश बोरसे, राजेंद्र निकम, नंदकिशोर शेवाळे, एकनाथ बिरारी, किरण आहिरे, शरद गांगुर्डे, प्रवीण उगले, ब्रिजकुमार परिहार, अनिल महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : कळवण तालुकाध्यक्षपदी दीपक महाजन, सटाणा तालुकाध्यक्ष सुरेश बच्छाव, देवळा महेश सोनकुळे, सुरगाणा एकनाथ बिरारी यांची, तर उर्वरित तालुकाध्यक्षपदांची निवड व कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल. 

या वेळी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस राज्याचे संघटक संजय भोकरे, विश्‍वास आरोटे, पद्माकर देशपांडे, हेमंत चंद्रात्रे, गिरीश होशिंग, संदीपकुमार ब्रह्मेचा, दिगंबर बोरसे, पालघर जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, कोकण विभागप्रमुख भूपेंद्र बोराडे, प्रदेश सरचिटणीस सुशील कुलकर्णी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.