Monday 27 April 2015

पत्रकार नामदेव गरुड यांचे निधन



डहाणू : दै. 'पुण्य नगरी' पालघरचे वार्ताहर, पत्रकार नामदेव गरुड याचे रविवार, २६ एप्रिल २0१५ रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्याच्या पश्‍चात मुलगा सुधीर, दोन विवाहित मुली आणि पत्नी, असा परिवार आहे.

नामदेव गरुड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातील चासकमान गावचे राहणारे. गेल्या २५ वर्षांपासून ते पत्रकारितेत काम करत होते. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास होता. अनेक सामाजिक कामेही त्यांनी केली आहेत. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर सफाळे येथे अंत्यसंस्कार होणार आहे. पालघरमधील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.