Monday 20 July 2015

पत्रकार दुबे हत्येप्रकरणी उपअधीक्षकांच्या निलंबनाची मागणी

भाईंदर : मीरा रोड येथील पत्रकार दुबे यांच्या हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका असलेले पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांना निलंबित करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

मीरा-भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक राघवेंद्र दुबे यांची शुक्रवारी सकाळी हत्या करण्यात आली होती. त्याची शोकसभा रविवारी मीरा रोडच्या सुरभी हॉलमध्ये आयोजित केली होती. त्या वेळी बोलताना संजय निरुपम यांनी म्हणाले की, पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांची भूमिका संशयास्पद आहे. बारवर धाड मारल्यानंतर दुबे यांना बोलावणे आणि काही वेळेतच त्यांचा खून होणे हे सारे काही संशयास्पद आहे. बावचेसह संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी दुबे कुटुंबीयांची भेट घ्यावी, त्यांना आर्थिक मदत करावी, जखमी पत्रकारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. सोमवारी याबाबतचे निवेदन पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना देणार आहे.