"मराठी वृत्तपत्र लेखक संघ" मुंबई च्या वतीने ३८ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. आपल्या प्रकाशित दिवाळी अंकांच्या २ प्रती "मराठी वृत्तपत्र लेखक संघ", शिंदेवाडी महापालिका शाळा, पालव मार्ग, दादर पूर्व, मुंबई १४. या पत्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी रमेश सांगळे यांच्याशी ९८२१५७४८९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Tuesday, 28 October 2014
Monday, 27 October 2014
पत्रकार अमलकुमार डे यांचे निधन
नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आणि व्यंगचित्रकार अमलकुमार डे (57) यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. त्यांच्यावर पश्चिम बंगालमधील राजगंज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
नवी मुंबईतील "महानगरी एक्स्प्रेस‘ या हिंदी साप्ताहिकाचे संपादक राहिलेल्या डे यांनी नामांकित वर्तमानपत्रांत पत्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून काम केले. एस. मुखर्जी यांच्या तीन चित्रपटांचे ते सहदिग्दर्शक आहेत. डे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मान्यवर लेखक, व्यंग्यचित्रकार व पत्रकारांनी डे यांच्या निधनानिमित्त शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Thursday, 23 October 2014
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे माजी संपादक ब्रॅडली यांचे निधन
वॉशिंग्टन पोस्टचे माजी संपादक बेंजामिन ब्रॅडली (९३) यांचे मंगळवारी निधन झाले. जगभरात गाजलेले वॉटरगेट प्रकरण उघड करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वॉशिंग्टन पोस्ट हे वर्तमान जागतिक दर्जाचे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अमेरिकेचे राजकारण हादरवणारे वॉटरगेट प्रकरण त्यांच्याच संपादकपदाच्या कारकिर्दीत घडले होते.
Sunday, 19 October 2014
मतमोजणीवर पत्रकारांचा बहिष्कार ?
निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांना फोटोग्राफी आणि व्हीडिओ शूटिंग करण्यास बंदी घातली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील पत्रकारानी मतमोजणीच्या वृत्त संकलनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोबाइल, लॅपटॉप इत्यादीवरही बंदी घालण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि प्रसिद्धीमाध्यम यांना फोटो आणि व्हीडिओ शूटिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ आयोग आणि पोलिस विभागाला अशी परवानगी असेल. त्यामुळे पत्रकारांनी या मतमोजणीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला असल्याचे समजते.
Saturday, 18 October 2014
पत्रकार कक्षातील चोऱ्यांमुळे भुरट्या पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी
Subscribe to:
Posts (Atom)