Tuesday 22 July 2014

पत्रकार मंगेश सोनावणे यांना पितृशोक

पत्रकार मंगेश सोनावणे यांचे पिता लोकशाहीर सीताराम बाबू सोनावणे यांचे रविवारी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. बॉम्बे एस. पी. सी. ए. मध्ये निरीक्षक पदावरून नवृत्त झाल्यानंतर बहुजन हितवर्धक कला संस्था, बहुजन कलावंत महामंचाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दमदार आवाजातील गायिकीतून आंबेडकरी चळवळ घराघरात पोहोचविण्याचे महान कार्य सोनावणे यांच्याकडून अविरतपणे सुरू होते. त्यांच्या मृत्यूने आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाले आहे. रविवार, ३ ऑगस्ट २0१४ रोजी सकाळी ९.00 वाजता खार पूर्व न्यू आंबेवाडी येथील विश्‍वशांती बुद्धविहारात त्यांचा जलदान विधी आणि शोकसभा आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार मंगेश सोनावणे यांनी दिली.