Wednesday 6 August 2014

तरुण भारतला डिफेन्स करन्स्पोन्डेंट कोर्सचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान

मुंबई - संरक्षण मंत्रलयाकडून प्रत्येक वर्षी डिफेन्स करस्पोंडेंट कोर्सचे आयोजन केले जाते. या कोर्सकरिता देशभरातून ज्या पत्रकारानी डिफेन्स पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले आहे. अशा ३१ जणांची निवड केली जाते. 

यावर्षी होणाऱ्या या कोर्स करीता सीमाभागातील बुलंद आवाज असलेल्या तरुण भारत या दैनिकाची निवड करण्यात आली आहे. या दैनिकामार्फत अमोल राऊत या कोर्से करीता एक महिनाभर देशातील डिफेन्स ठिकाणी जाऊन प्रतिनिधित्व करणार आहेत. देशाची आर्थीक राजधानी असलेल्या मुंबईतून केवळ चौघांची निवड झाली असून दोन इंग्रजी वर्तमानपत्र, एक इंग्लिश न्यूज़ चैनल आणि मराठीतून फक्त दैनिक तरुण भारतची निवड झाली आहे. मुंबईतील वर्तमानपत्रातील जीवघेण्या स्पर्धेत देखील दैनिक तरुण भारतने आपला ठसा उमटविला असून, अमोल राऊत यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 
( बेरक्या उर्फ नारद फेसबुक मधून साभार )