Tuesday 2 September 2014

‘पीटीव्ही’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर हल्ला

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. गडबडी करून निवडणूक जिंकल्याचा पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर आरोप आहे. शरीफ यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ‘तहरिक-ए-इन्साफ’चे इम्रान खान आणि ‘अवामी तहरिक’चे ताहिर-उल-कादरी हे दोघे नेते आपल्या हजारो समर्थकांसह इस्लामाबादेत आंदोलन करीत आहेत. आंदोलकांनी सोमवारी थेट पीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर हल्ला केला. तेथे घुसखोरी करून त्यांनी तेथील कॅमेर्‍याची तोडफोड केली आणि प्रसारणही बंद पाडले. त्यांना अडविण्याची कुणीही हिंमत करू शकले नाही. अखेर पाकिस्तानी लष्कराने पीटीव्ही मुख्यालय आपल्या ताब्यात घेऊन आंदोलकांना बाहेर काढले.