Wednesday 1 October 2014

पत्रकार दीपक चव्हाण रोटरीच्या नेशन बिल्डर्स पुरस्काराने सन्मानित

सांगलीच्या वेश्या वस्तीत वेश्या महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करून वेश्या महिलांच्या जीवनात जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे आणि सिंगापूरच्या लायब्ररी मध्ये आपला ठसा उमठवणार्या पत्रकार दीपक भीमराव चव्हाण याना रोटरी इंडिया लिटरेसी मिशनच्या नेशन बिल्डर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्रामबाग येथील खुलेनाट्यगृहात आयोजित सोहळ्यात दीपक चव्हाण यांना गौरवण्यात आले.


पत्रकार दीपक चव्हाण यांनी समाजातील दुर्लक्षित घटक समजल्या जाणार्या वेश्या महिलांसाठी सांगलीच्या काळ्या खाणी नजीकच्या वेश्या वस्तीत देशातील पहिली शाळा सुरु करून महिलांच्या जीवनात परिवर्तनाची मेढ रोवली.यासह दीपक चव्हान यांच्या प्रयत्नाने याच वस्तीतील वेश्या महिलांच्या मुलांसाठी राज्यातील पहिली अंगणवाडी सुरु करण्यात आली . या कामासाठी वेश्या महिला एड्स निर्मुलन केंद्राच्या अध्यक्षा अमिराबी शेख याना द रियल हिरो, झी वाहिनीचा अन्यय सन्मान पुरस्कार तसेच पत्रकार दीपक चव्हाण गोवा गौरव पुरस्कार , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक पत्रकारिता पुरस्कार, कॉंग्रेस सेवादलाचा विशेष पुरस्कार यासह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

मागील महिन्यातच बेंगलोर येथील एका सामाजिक संस्थेने वेश्या शाळेच्या केलेल्या डोक्यूमेंटरीने सिंगापूरच्या लायब्ररी मध्ये प्रोफेशनल विभागात जगातील स्पर्धकांना मागे टाकीत पहिल्या पाच क्रमांकात स्थान पटकावले आहे. पत्रकार दीपक चव्हाण याच कार्याची दखल घेत रोटरी इंडिया लिटरेसी मिशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थेने पत्रकार दीपक चव्हाण यांना वेश्या महिलांनाशिकवण्याचे महान   हाती घेतल्याबद्दल आपल्या नेशन बिल्डर्स पुरस्काराने सन्मानित केले.

विश्रामबागयेथील खुलेनाट्यगृहात आयोजित सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हालीचे अध्यक्ष रोटरीयन उदय कुलकर्णी यांच्याहस्ते पत्रकार दीपक चव्हाण यांना गौरवण्यात आले.याच कार्यक्रमात समाजात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काय करणार्या शिक्षकांचाही सन्मान करण्यातआला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हालीचे सदस्य विशाल कुलकर्णी, स्नेहल गौडाजे आदींसह मान्यवर उपस्थित होते.