Friday 30 May 2014

पालिकेतील पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांना धमक्या

मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांसाठी "जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" या नोंदणीकृत युनियनच्या संलग्न असलेला "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" स्थापन केल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये दूरध्वनीकरून पदाधिकारी असलेल्या तुमच्या पत्रकाराला  समजावा जनसंपर्क अधिकारी खबाळे पाटील आमच्या सोबत आहे अश्या धमक्या देण्यात येत आहेत.

'नेटवर्क १८ 'वर रिलायन्सचा ताबा, राजदीप आणि सागरिका यांचा राजीनामा

रिलायन्स इंडस्ट्रीजने आज "नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट' (एनडब्ल्यू १८) तसेच दुय्यम अंगभूत कंपनी "टीव्ही १८ ब्रॉडकास्ट' यांचा ताबा मिळविला आहे. यामुळे जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तर नेटवर्क १८ चे कार्यकारी संचालक राघव बहल हे सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. 

Tuesday 27 May 2014

पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष

मुंबई : राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा लोकसभा निवडणुकीत जो दारूण पराभव झाला, त्यामागे प्रसिद्धी व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा अघोषित असहकार कारणीभूत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा माध्यमांशी असलेला संवादाचा अभाव हेदेखील एक कारण असल्याचे ज्येष्ठ पत्रकारांचे मत आहे. पत्रकारांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याने वृत्तपत्र संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Sunday 25 May 2014

पुनम पोळ प्रकरणी संपादक आणि जनसंपर्क अधिकारी अडचणीत



मुंबई तरुण भारत वृत्तपत्रासाठी मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पूनम पोळ यांना जनसंपर्क अधिकाऱ्याच्या शौचालयामधील स्ल्याब पडल्याची, स्ल्याब मधून पाणी गळत असल्याची बातमी प्रसिद्ध केल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. पोळ यांची नोकरी जाण्यामागे जनसंपर्क अधिकाऱ्याने  वृत्तपत्राच्या जाहिराती बंद करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. 

Wednesday 21 May 2014

जनसंपर्क अधिकाऱ्याकडून जाहिराती बंद करण्याच्या धमक्यांमुळे पत्रकाराची नोकरी गेली

मुंबई महानगर पालिकेमध्ये दैनिक "मुंबई तरुण भारत" या वृत्तपत्रासाठी वृत्तसंकलन करणाऱ्या पुनम पोळ या महिला पत्रकाराने जनसंपर्क अधिकाऱ्याच्या शौचालायामधील स्ल्याब पडल्याची, पाणी गळत असल्याची बातमी आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती. जनसंपर्क अधिकाऱ्याने वृत्तपत्राच्या जाहिराती बंद करण्याच्या धमक्या दिल्याने पोळ यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. 

अंबाजोगाईच्या पत्रकारास धमक्या

बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील दैनिक विविकसिंधूचे संपादक नानासाहेब गाठाळ यांना आमदार पृथ्वीराज साठे  यांनी अवार्च्चा शिविगाळ करून धमक्या दिल्या आहेत.तुमच्या मुलाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्ही कसे वतर्मानपत्र चालवता ते बघतो अशीही धमकी त्यांनी गाठाळ यांना दिली आहे.विविकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजित गाठाळ यांनी निवडणूक निकालाचे विशलण करणारा एक लेख लिहिला होता.त्यात साठे यांच्यावर कसलीही व्यक्तीगत टीका केलेली नव्हती.तरीही त्यांनी धमक्या दिल्या आहेत.या प्रकरणी नानासाहेब गाठाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली असून विषय आर.आर.पाटील यांच्या कानी घालण्यात आला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी समितीने केली आहे.

फोटो जर्नालिस्टचा हलकटपणा

आपण ज्या व्यवसायात असतो त्या व्यवसायाचं पावित्र्य प्रत्येकानं राखलंच पाहिजे.मात्र सर्वच व्यवसायात आता अशीे काही मंडळी आलेली आहे की,त्यांनी व्यवसायाचा धंदा केला आहे.नव्हे त्याचं पावित्र्यच संपवून टाकलं आहे.युक्रेनच्या एका फोटो जर्नालिस्टनं साऱ्या माध्यम जगतावर शरमेनं खाली मान घालण्याची वेळ आणली आहे.

आणखी एका पत्रकारावर चंदा जमा करून अत्यंसंस्कार

aaaaaaaaa
बातमी धक्कादायक आहे.काही दिवसांपूर्वी भूकबळी गेलेल्या मध्यप्रदेशमधील एका पत्रकारावर चंदा जमा करून अंत्यसंस्कार केल्याची बातमी येथेच दिली होती.आता उत्तर प्रदेशमधून पुन्हा अशीच बातमी आली आहे.लखनौस्थित पत्रकार शिव आसरे अस्थाना यांचा 14 तारखेला ब्रेन हॅब्रेजने मृत्यू झाला.मात्र त्यांच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते त्यामुळे पत्रकारांनीच कोणी हजार,कोणी दोन हजार रूपये दिले आणि अस्थाना यांच्यावर अत्यंसस्कार केले गेले. अस्थाना दोन नियतकालिकाचे संपादक होते.तरीही त्यांची घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती.देशातील असंख्य पत्रकार आज याच अवस्थेतून जात आहेत.जी मंडळी पत्रकारांच्या नावाने गळे काढते अशांनी कधी तरी पत्रकारांच्या वास्तव आयुष्याची कधी विचारपूस केलीय काय हा प्रश्न नेहमीच पडतो.

सिरीयात पत्रकाराची हत्त्या

सिरीयात सुरू असलेल्या गृहयुध्दाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लंडन टाइम्सचे पत्रकार एथोनी लायड यांची हत्त्या केली गेली.त्याचे छायाचित्रकार जैक हिल जखमी अवस्थेत थोडक्यात बचावले.सिरीयाच्या अलैप्पो भागात ही घटना घडली.काही दिवसांपुर्वी ताल ऱिफत या अतिरेकी संघटनेने या पत्रकारांचे अपहरण केले होते.पत्रकारांनी तेथून पलायन कऱण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळेस त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला गेला.सिरीयात आतापर्य़त 62 पत्रकारांच्या हत्त्या करण्यात आल्या आहेत.

डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे पत्रकाराचा मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जळगाव जिल्हयातील एका तरूण पत्रकाराचा मृत्यू झाल्याची अत्यंत ह्रदयद्रावक बातमी हाती आली आहे. गणेश खांबेटे ( रा.अडावद ता.चोपडा) हे सकाळचे बातमीदार 1 मे रोजी जळगाव येथून पहाटे एका खासगी वाहनाने आपल्या अडावद गावी जाण्यासाठी निधाले होते. ते ज्या गाडीतून जात होते त्या गाडीला रस्तयात अपघात झाला.अपघातात त्यांच्या डोळ्याला आणि डाव्या हाताला दुखापत झाली.हाताचे हाड मोड्‌ल्यानं त्यांना गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली.

Monday 5 May 2014

'भांडवलदारीमुळे पत्रकारांची ससेहोलपट'

पत्रकारितेत विचारस्वातंत्र्यापेक्षा अर्थकारणाचा भाग मोठा बनला आहे. राजकीय पुढारी आणि उद्योजक आजच्या वृत्तपत्रांचे मालक बनले आहेत. पत्रकारिता आता भांडवलदारी उद्योग झाला आहे; त्यामुळे पत्रकारांची ससेहोलपट होत आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागूल यांनी व्यक्त केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय; मुलुंड विभाग, ग. क. खांडेकर आणि न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमालेत "संपादकाच्या खुर्चीतून' या विषयावर ते बोलत होते. 

पत्रकार मंदार पारकर यांना मातृशोक



मुंबई : दैनिक 'पुण्य नगरी'चे मंत्रालय प्रतिनिधी आणि मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह मंदार पारकर यांच्या मातोश्री विजया बाळकृष्ण पारकर यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या श्‍वसनाच्या विकाराने त्रस्त होत्या. वाढत्या वयोमानामुळे त्यांच्यावरील उपचारांनाही शरीर पुरेशी साथ देत नव्हते. रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला अणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे, एक मुलगी तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. भोईवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Thursday 1 May 2014

जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनी "मुंबई महानगपालिका पत्रकार संघाची" स्थापना

मुंबई महानगर पालिकेत वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांमध्ये होणारा भेदभाव, पलिकेकडून व पालिकेच्या अंगीकृत असलेल्या बेस्ट प्रशासनाकडून पत्रकाराना मिळणाऱ्या सोईं सुवीधा प्रत्तेक पत्रकारला मिळाव्यात, यासाठी जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनी " मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.  "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " " जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र " या पत्रकारांच्या यूनियनला सलग्न राहून पालिका आणि बेस्टमध्ये काम करणार आहे.

"मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाच्या सन २०१४ - २०१५च्या कार्यकारणीवर अध्यक्षपदी राधिका यादव (दैनिक "पूर्णविराम" ) सेक्रेटरीपदी अजेयकुमार जाधव (दैनिक "जनतेचा महानायक") खजिनदारपदी सुजाता ठाकूर (दैनिक "खबरे आज तक") कार्यकारणी सदस्य म्हणून योगेश जंगम (दैनिक "नवाकाळ"), काशिनाथ महादे (दैनिक "नवशक्ती"), पुनम पोळ (दैनिक "मुंबई तरुण भारत"), प्रथम गायकवाड (दैनिक "वृत्तरत्न सम्राट") यांची तर सल्लागार म्हणून नारायण पांचाळ (दैनिक "सागर") जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई महानगर पालिकेतील पत्रकार म्हणून अनुभव घेतलेल्या पत्रकारांनी नवीन पत्रकार संघ स्थापन झाल्याबाबत आनंद व्यक्त केला असून पत्रकार संघाला सुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघातील पत्रकाराप्रमाणे पालिकेमधील पत्रकारानाही सुविधा मिळवून देण्यासाठी "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " या संघटनेला पाठींबा देण्याचे आश्वासन विविध पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी दिले आहे. 
वेबसाईट - http://bmcpress.blogspot.in