Wednesday 14 October 2015

"बेरक्या मिडिया न्यूज" ऐवजी "प्रेस मिडिया न्यूज" हा नवीन ब्लॉग सुरु


"बेरक्या मिडिया न्यूज" ( http://berakya.blogspot.in ) हा ब्लॉग सुरु झाल्यापासून भल्याभल्या वृत्तपत्रांची / पत्रकारांची चुकीची कामे उघड केली आहेत. यामुळे कित्तेकांचे धाबे दणाणले आहेत. "बेरक्या उर्फ नारद" हा ब्लॉग आधी पासून सुरु आहे. आमचाही ब्लॉग बेरक्या या नावाने सुरु असला तरी या ब्लॉगचे नाव "बेरक्या मिडिया न्यूज" असे आहे.

बेरक्या या एकाच नावाच्या सुरुवातीने दोन ब्लॉग असल्याने वाचकांमध्ये नेमकी कोणती पोस्ट कोणत्या बेरक्याच्या ब्लॉगवर पडली याबाबत संभ्रम निर्माण होत आहे असे काही वाचकांनी आम्हाला कळविले आहे. "बेरक्या मिडिया न्यूज" या ब्लॉगचे नाव बदलावे असेही वाचकांनी सुचविले आहे. वाचकांसाठी आमचा ब्लॉग चालवला जात असल्याने वाचकांच्या सल्ल्याचा योग्य आदर ठेवला जात आहे.

आम्ही आमच्या नावा पेक्षा कामाला जास्त महत्व देतो. यामुळे "बेरक्या मिडिया न्यूज" या नावाने चाललेला ब्लॉग बंद करत असलो तरी या ब्लॉग वरील जुन्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचकांना वाचता याव्यात म्हणून हा ब्लॉग तसाच ऑनलाईन सुरु राहणार आहे. "बेरक्या मिडिया न्यूज" ऐवजी "प्रेस मिडिया न्यूज" हा नवीन ब्लॉग सुरु करण्यात आला आहे.

"प्रेस मिडिया न्यूज" या नवीन ब्लॉगवर वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, पत्रकार, पत्रकार संघटना यांच्या घडामोडीची माहिती असणार आहे. आमच्या वाचकांना आवडणाऱ्या अश्या वाचनीय बातम्या "प्रेस मिडिया न्यूज" या ब्लॉगवर असतील. आपण ज्या प्रमाणे "बेरक्या मिडिया न्यूज" या ब्लॉगला सहकार्य केले तसेच सहकार्य "प्रेस मिडिया न्यूज" या ब्लॉगलाही करावे हि अपेक्षा.

"प्रेस मिडिया न्यूज" या ब्लॉगला भेट देण्यासाठी http://pressmedianews.blogspot.in या लिंकला भेट द्या.

मटक्‍याचे आकडे छापणाऱ्या दैनिक "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘वर गुन्हा दाखल

गोव्यात मटक्‍याचा धंदा जोरात सुरु आहे. मटक्याचा धंदा चालवणारे आपला धंदा आणखी जोरात चालवा म्हणून वृत्तपत्रातून जाहिराती देत असतात. अश्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या दैनिक "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाई मुळे बेकायादेशीर कामे करणाऱ्यांना वृत्तपत्रांचीही साथ असल्याचे उघड झाले आहे. वृत्तपत्रांसह काही मटका ऑपरेटर तसेच एक अनोळखी मंत्री, काही राजकारणी, पोलिस अधिकाऱ्यांवरही उच्च न्यायलयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु झाला असून संबंधित वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांकडेही चौकशी होईल असे या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वेश कर्पे यांनी सांगितले.  

Monday 12 October 2015

पत्रकार इंगळे हल्ला प्रकरणी तिघांना अटक

आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे पत्रकार जीत इंगळे आणि त्यांच्या दोन भावांवर प्राणघातक हल्ला झाला या प्रकरणी शेट्टी अन्ना उर्फ़ शेलवम, नॉनी उर्फ़ सागर कोरेगावकर आणि संतोष सोनवणे यांना अटक करण्यात आली असून या तिघांना मंगळवारी वसईच्या न्यायालयात हजार केले जाणार आहे. 

पोलीस निरीक्षकाकडून पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी

मावळातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्‌याच्या बातम्या सतत प्रसिध्द करणा-या तसेच कामशेतसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मीतीसाठी सतत पाठपुरावा करणा-या पत्रकारांना वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव व पोलीस हवालदार बाबा शिंदे यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मावळ पत्रकार संघातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पनवेलमध्ये पत्रकाराला मारहाण

पनवेल: पनवेल येथील दैनिक कर्नाळा या दैनिकाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात घडला आहे.शनिवारी रात्री १० च्या सुमारास शिरढोण गावातील तीन युवकांनी योगेश मुकादम या २६ वर्षीय पत्रकाराला मारहाण केली.व जीवे मारण्याची धमकी दिली.वर्तमान पत्रात बातमी दिल्याचा राग मनात ठेऊन या तिघांनी योगेश मुकादम यास मारहाण केली.

Friday 9 October 2015

अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती प्रक्रिया सुसूत्रीकरणाबाबत प्रसाद काथे यांचे पत्र

अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती प्रक्रिया सुसूत्रीकरणाबाबत समितीचे सदस्य प्रसाद काथे यांनी एक पत्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी यांना दिले आहे. हे पत्र "बेरक्या मिडिया न्यूज" पोर्टलच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

‘सकाळ’च्या संशयास्पद शेअर हस्तांतराची चौकशी - उच्च न्यायालय

सकाळ पेपर्सचे संस्थापक दिवंगत नानासाहेब भिकाजी परुळेकर यांच्या कन्या क्लाऊडे लीला परुळेकर यांच्या सकाळ पेपर्समधील शेअर्सचे तसेच त्यांच्या बँक खात्यांत मार्च २०१० नंतर झालेले व्यवहार खरोखर त्यांनीच केले होते काय, हे तपासून पाहावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांचे शेअर्स ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या नावे हस्तांतरित करण्याचा व्यवहार संशयास्पद वाटतो, असे नमूद करतानाच लीला यांच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. प्रगती व्यास आणि मनोज ओसवाल यांनी केलेल्या याचिका निकाली काढताना न्या. अभय ओक व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने बुधवारी हा आदेश दिला. उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे अभिजित पवार यांना हा मोठा धक्का असल्याची चर्चा महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये आहे. 

Thursday 8 October 2015

मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून परिषदेचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ आणि वयोवृध्द पत्रकार दिनू रणदिवे यांना जाहीर करण्यात आला आहे.11 हजार रूपये रोख मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.येत्या 3 डिसेंबर रोजी परिषदेच्या 77व्या वर्धापनदिनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितऱण करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

मंत्रालयात पत्रकारांना सकाळचे प्रवेश बंद !

मंत्रालयात सामान्य जनतेला दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जातो. त्याच प्रमाणे पत्रकारांनाही दोन नंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा असा फतवा सरकारने काढला आहे. यामुळे मंत्रीमंडळ बैठकी व इतर वृत्तसंकलनासाठी दुपारी दोन आधी उपस्थित कसे राहावे असा प्रश्न पत्रकारांना पडला आहे.

Saturday 3 October 2015

प्रहार, पत्रकारांना धमक्या, मी मराठी अपडेट

नाही म्हणता 'प्रहार' सध्या जवळपास सहा वर्षांचा कालावधी पूर्ण करत आहे. या सहा वर्षांच्या काळात कोणतीही ठोस कामगिरी प्रहारने दाखवली नाही. आजमितीला प्रहार शेवटच्या घटका मोजत आहे. त्याचा खप सध्या दोन ते तीन हजारांच्या आसपास असल्याचे अगदी खात्रीलायक वृत्त आहे. जाहिरातीही फार नाहीत. ज्या काही जाहिराती मिळतात त्या केवळ सरकारी असतात. नारायण राणे यांना खूष करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढूनताणून टीका केली जाते, आणि याच पानावर नरेंद्र मोदी यांचा हसरा फोटो असणारी अर्धापान जाहिरातही प्रसिद्ध केली जाते. हा दुटप्पीपणाच आहे.

उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा परिचय मेळावा

उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या वतीने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात वास्तव्य असलेल्या पत्रकारांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा बोरिवली (पूर्व), मागाठणे बस आगारा समोरील जनरल अरुणकुमार वैद्य नगर मार्गावरील सहकार भवन सभागृह, नाट्यनिर्माते मोहन वाघ उद्यानात (फुलपाखरु गार्डन) येथे होणार आहे. या मेळाव्यास पत्रकारांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस योगेश त्रिवेदी (गुरुजी) व सहचिटणीस प्रवीण वराडकर यांनी केले आहे.

Thursday 1 October 2015

मंत्रालयातील पाकीटबहाद्दर पत्रकारांची हुकुमशाही

विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आपल्या पत्रकारांना मंत्रालयात वृत्तसंकलन करण्यासाठी नेमणूक करत असतात. मंत्रालयाचे वृत्तसंकलन करताना पत्रकारांना आपल्या वाहिनी किंवा वृत्तपत्रासाठी जशी बातमी हवी तशी मिळवण्याचा किंवा प्रश्न विचारून तशी बातमी मिळवण्याचा हक्क आहे. परंतू असा हक्क मंत्रालयात वर्षानुवर्षे आपली दुकाने थाटून बसलेल्या पत्रकारांनी हिरावून घेण्यास सुरुवात केली आहे. दुकानदारी करणाऱ्या हुकुमशाही पत्रकारांमुळे संतापाची लाट पसरली आहे. 

जीवघेण्या स्पर्धेत खऱ्या बातम्या पोहोचवण्याची प्रिंट मिडियाला सुवर्णसंधी

नवी दिल्ली - सोशल मिडिया आणि न्यूज चॅनल्स यांच्यातील जीवघेण्या स्पर्धेमध्ये वाचक, प्रेक्षकवर्गापर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि ते काम करण्याची सुवर्णसंधी प्रिंट मिडियाकडे असल्याचे सूचना आणि प्रसारणमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. 

खंडणीखोर पत्रकारांना रंगेहात अटक

मुंबई - मानखुर्द पोलिसांनी २ खंडणीखोर पत्रकारांना रंगेहात पकडले आहे. मानखुर्दमधील मंडाला अधिकृत शिधावाटप दुकानदाराकडे त्यांनी धान्याचा काळाबाजार उघड करण्याची भीती दाखवून खंडणी मागितली होती.गणेश जयराम जैसवाल व रुपकुमार रघुवंशी असे अटक करण्यात आलेल्या पत्रकारांची नावे आहेत.