Sunday 27 April 2014

वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण

मुंबई : वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मालाड येथे एका टोळक्याने मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी मालाड (प.) येथे घडला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Thursday 24 April 2014

मुंबईमध्ये पोलिसांची पत्रकाराला मारहाण

जनादेश वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश पाटील मनसे आणि सेने मधल्या राड्याचे चित्रीकरण करण्यास गेले असता पाटील यांना पन्हाळे आणि मोहन अडसूळ या दोन पोलिस उपनिरीक्षकांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यामध्ये जबर मारहाण केली. तसेच त्यांनी चित्रीकरण केलेली डिव्ही पोलिसांनी काढून घेतली आहे. पाटील यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. याबाबत अद्याप कोणावरही कारवाही झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

Wednesday 23 April 2014

पत्रकारिता सर्वात ” भिकार” नोकरी

राज ठाकरे यांनी अर्णव गोस्वामी असतील किंवा राजदीप सरदेसाई असतील यांना मुलाखतीच्या वेळेस कशी वागणूक दिली ते आपण पाहिलंच आहे.( गोस्वामी आणि राजदीप सरदेसाई हे सध्याचे देशातील स्टार पत्रकार आहेत त्यांना अशा पध्दतीनं वागविलं जात असेल तर अन्य पत्रकारांची काय अवस्था असेल याची आपण कल्पना करू शकतो ) त्या अगोदर शरद पवार आणि गल्लाी बोळातील अन्य नेतेही पत्रकारांशी तुच्छतेच्या भावनेनेच वागत असल्याचं आपण अनुभवतो आहोत.पत्रकारांवरील हल्ले याच मानसिकतेचे द्योतक आहेत.यामुळेच असेल कदाचित पत्रकाराची नोकरी सर्वात भिकार नोकरी असल्याचं मानलं जात आहे.अमेरिकेत एका पाहणीतून हा निष्कर्ष समोर आलाय.

पत्रकार सुमित अवस्थीला धमकी


sumit

मोदी पत्रकारांसाठी मुसिबत ठरत आहेत काय दिसतंय तरी तसंच.कारण मोदींबद्दल काही विचारलं की,नेते भडकतात,पत्रकारांच्या अंगावर धावतात.राज ठाकरेंना मोदीना दिलेल्या पाटिंब्या बद्दल विचारल े असता वारंवार तेच तेच काय विचारता म्हणत ठाकरे मुलाखत घेणाऱ्यां पत्रकारांवर भडकले .आता भाजपचे नेते मुरली मनोहर जोशीही झी न्यूजच्या सुमित अवस्थी यांच्यावर असेच भडकले.नरेद्र मोदींच्या संदर्भात अवस्थी यांनी प्रश्न विचारताच मुरली मनोहर भडकले या विषयावर प्रश्न विचारायचा नाही असे सांगत झालेले सारे रेकॉर्डिंग डिलीट कऱण्याचे आदेश सुमित अवस्थी यांना दिले.परंतू अवस्थी यांनी त्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पत्रकारास धमकावले आणि घराच्या बाहेर कसे पडता ते बघतो अशी सरळ धमकीच दिली.

गर्भवती महिला पत्रकारावर रेप करा

पत्रकार परिषदेत अथवा मुलाखतीत आपणास न आवडणारा प्रश्न विचारल्यानंतर केवळ आपल्याकडंच पुढारी पत्रकारांवर भुंकतात किंवा त्यांची लाज काढतात असं नाही तर हा जागतिक रोग असल्याचं रशियातील एका घटनेतून समोर आलंय.

Sunday 20 April 2014

पत्रकारांमधील स्वाभिमान मेला

टाइम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी, आणि सीएनएन-आयबीएनचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी राज ठाकरे यांच्या स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या .या मुलाखती म्हणजे प्रश्न कसे विचारू नयेत आणि त्याला उत्तरं कशी देऊ नयेत याचं उत्तम उदाहरणं होत्या.मुलाखत देणारा कोणी आरोपी नसतो हे जसं खरंय तसंच मुलाखत घेणाराही कोणी भिकारी नसतो हे सत्य दोन्ही बाजु विसरल्या आणि पत्रकारिता आणि राजकारणाची पातळी कोणत्या थराला गेलीय याचां प्रत्यय दोन्ही बाजुंनी जगाला आणून दिला .

जियो वृत्तवाहिनीचे संपादक हमीद मीर यांच्यावर गोळीबार

पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्यावर कराची शहरात काही अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला. जियो वृत्तवाहिनीचे संपादक असणारे मीर कार्यालयात जात असताना काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात हमीद मीर यांच्या शरीराच्या खालच्या भागात दोन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. 

Sunday 13 April 2014

“आप” चालवतेय बेकायदेशीर वृत्तपत्र

कोणतंही वृत्तपत्र अथवा नियतकालिक सुरू करताना त्याची नोंदणी रजिस्टार ऑफ न्यूजपेपर दिल्ली यांच्याकडं करावी लागते. तसं न करणारं वृत्तपत्र हे बेकायदा केलेले कृत्य असतं आणि त्यासाठी योग्य ती शिक्षेची तरतूदही कायद्यात आहे. टीम अरविंद केजरीवालला याची माहिती तरी नसावी किंवा आपण कायद्याच्या वर आहोत अशा अहंकारात तरी ही मंडळी वागत असावी.म्ङणूनच्‌ त्यानी आप की क्रांती नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलेलं आहे.

पत्रकारांना जाहिरनाम्यातून ठेंगा

पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांच्या अन्य मागण्यांच्या संदर्भात राजकीय पक्षानी आपली भूमिका आपल्या जाहिरनाम्यातून स्पष्ट करावी अशी विनंती करणारी पत्र ं पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना पाठविली होती.मात्र आता बहुतेक सर्वच राजकीय पक्षाचे जाहिरनामे प्रसिध्द झाले आहेत मात्र कोणीही आपल्या जाहिरनाम्यातून पत्रकारांच्या प्रश्नंाबद्दल अवाक्षरही काढ्‌ल्याचे वाचनात आलेले नाही. 

चॅनल्सवाले आता आपसात कपडे फाडायला लागले

इतरांचे स्टींग करून थकलेले चॅनल्सवाले आता आपसात कपडे फाडायला लागलेत.न्.ूज एक्स्प्रेसने चॅनल वन आणि लेमन टीव्हीचे स्टींग करून माद्यमांचा चेहरा जगासमोर आणला. ऑपरेशन मिडिया नामक या ऑपरेशनने चॅनल वन आणि लेमन टीव्हीचे मालक जहीर अहमद हे जाहीरपणे कमाओ,बाटो,एक-एक जगब खूल जाओ असे बोलताना कॅमेऱ्यात दिसले.यात वाहिन्यांचे वर्तमान संपादक अंजनी कुमार यांनाही दाखविले गेले आहे.चॅनल वन आणि लेमन टीव्हीच्या माध्यमातून कशा प्रकारे पेज न्यूजचा धंदा सुरू आहे यावर स्टींगमध्ये भाष्य केले आहे.या स्टींग मुळे दोन्ही वाहिन्यांची हालत बेकार झालीय.न्.ीज एक्स्प्रेसच्या विरोधातही अशीच एखादी स्टोरी लेमन वरून दाखविली जाण्याची शक्यता आहे. एका वाहिनीने दुसऱ्या वाहिनीचे स्टींग कऱण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.
operation-media

Friday 11 April 2014

मिडिया देश के लिए बडा खतरा-आजम


azzam

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सपा नेता आजम खांन यांनी आज पुन्हा तारे तोडले.ते आता माध्यमांवर घसरले.मिडियापासून देशाला मोठा धोका असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.मिडियाला मोदीने खरेदी केलेले असल्यानेच चॅनल उघडले की,जिकडे तिकडे मोदीच दिसतात.इलेक्टॉनिक मिडियाची कातिल अशा शब्दात संभावना करीत ते म्ङणाले,समजावादी सरकारला समुद्रात बुडविण्याची माध्यमाचा डाव आहे.

पत्रकारांची मानवी साखळी

सोनभद्र येथील अमर उजालाचे पत्रकार जुल्फेकार हैदरअली खंा यांना पोलिसांनी अत्यंत अमानूषपणे मारहाण केली.त्याच्याविरोधात काल पत्रकार रस्त्यावर उतरले.जिल्हाधिकाऱ्यंना दिलेल्या निवेदनात मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ अटक कऱण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी पत्रकारांनी मानवी साखळी तयार करून शांततेच्या मार्गाने घटनेचा निषेध केला.वारानसी येथील रूग्णालयात पत्रकार जुल्फेकार जीवन मृत्यीशी लढा देत आहेत त्यांच्या उपचाराची व्यवस्था सरकारने करावी अशीही मागणी केली गेली आहे.

पेड न्यूजच्या विरोधात पीआयएल

प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक मिडियातील पेड न्यूज वर प्रतिबंध लावण्यासाठी सुप्रिम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील एका बेंच पुढे या याचिकेवर शुक्रवार दिनाक 11 एप्रिल रोजी सुनावणी होईल.
सुप्रिम कोर्टातील एका वकिलाने ही याचिका दाखल केली असून त्यात भारतीय निवडणूक आयोग आणि पाच विभागीय मिडिया घराण्यांना प्रतिवादी बनविण्यात आलंय.पेड न्यूज्‌ जाहिरातीच्या माध्यमातून जनतेला विशिष्ठ व्यक्ती किंवा पक्षाला मतदान करण्यास प्रेरित केले जाते असे याचिेकेत म्हटले आहे.जे मिडिया हाऊसेस अशा उद्योगात आहेत त्याच्यावर कारवाई कऱण्याची मागणी देखील करण्यात आली आङे.

Tuesday 8 April 2014

केजरीवाल जनतेला माघ्यमांच्या विरोधात भडकवत आहेत

“सत्ता आल्यावर माध्यमांना तुरूंगात डांबू” अशी धमकी देऊन झाल्यावर आणि त्यानंतर मिडियाने अरविंद केजरीवाल यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने वैतागलेल्या केजरीवाल यांनी आता जनतेलाच मिडियाच्या विरोधात भडकविण्यास सुरूवात केली आहे.

Sunday 6 April 2014

शेवाळेंची पत्रकारांना "प्रीतम" पार्टी

मुंबई महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शनिवारी ५ एप्रिल २०१४ रोजी दादरच्या प्रीतम हॉटेल मध्ये एक पार्टी दिली आहे. शेवाळे यांनी हि पार्टी गेले काही दिवस आपल्या निवडणुकीच्या बातम्या न चुकता पैसे घेवून लावणाऱ्या मोठ्या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणवणाऱ्या पत्रकारांनाच दिली असल्याची माहिती या पार्टी मध्ये सहभागी झालेल्या पत्रकाराने बेरक्याला दिली आहे.

पत्रकारांचे हात ओले

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदारसंघात तर सर्वच प्रमुख पक्षांमध्ये मतदारांचे खिसे गरम करण्याआधी पत्रकारांचे हात ओले करण्याची चढाओढ लागली आहे. सर्वाकडून निरपेक्ष भावनेने 'दौलतजादा' स्वीकारणाऱ्या या बातमीदारांच्या लेखण्या आता त्यांच्या त्यांच्या वृत्तपत्रांतून नेमक्या कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात चालणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे.  

Saturday 5 April 2014

‘एपी’च्या पत्रकाराची हत्या

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 'असोसिएटेड प्रेस' (एपी) या वृत्तसंस्थेच्या फोटोग्राफरचा मृत्यू झाला, तर पत्रकार जखमी झाला. अंजा नाईद्रिंगॉस (वय ४८) या जर्मनीतील प्रसिद्ध फोटोग्राफर आणि वार्ताहर कॅथी गॅनन या दोघीही कारमध्ये बसल्या होत्या. त्या वेळी अफगाणिस्तान पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात अंजा मृत्युमुखी पडल्या, तर कॅथी जखमी झाल्या. कॅथी या 'एपी'च्या अनेक वर्षांपासूनच्या वार्ताहर होत्या. सध्या त्या या वृत्तसंस्थेच्या अफगाणिस्तान ऑफिसच्या प्रमुख आहेत. या भागातील एक वरिष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

शक्ती मिल अत्याचार प्रकरण-तिघांना फाशी



मुंबई : दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणापाठोपाठ संपूर्ण देश हादरवणार्‍या शक्ती मिल सामूहिक अत्याचार प्रकरणात सत्र न्यायालयाने शुक्रवारी तिघा नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली. आधी टेलिफोन ऑपरेटर व नंतर छायाचित्रकार तरुणीवर पाशवी अत्याचार करून मुंबईची अब्रू वेशीला टांगणार्‍या विजय जाधव, कासीम बंगाली व मोहम्मद सलीम अन्सारी या नराधमांना सहानुभूती दाखवल्यास न्यायव्यवस्थेची विटंबना होईल, असे मत व्यक्त करत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. छायाचित्रकार तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील चौथा दोषी सिराज रेहमान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना न्यायालयाने दिलेल्या या निकालाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

Friday 4 April 2014

युएनआय डबघाईला

uni-2
बातम्या मिळविण्याचे अनेक स्त्रोत उपलब्ध झाल्याने अनेक जिल्हा आणि विभागीय वर्तमानपत्रांंंनी आपल्या कार्यलयातील पीटीआय आणि युएनआयची सेवा खंडित केली आहे.त्यामुळे युएनआय समोर आर्थिक संकट उभे राहिले असून वर्तमानपत्रांचा आत्मा असलेली युएनआय आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या आठ महिन्यापंासून य़ुएनआयला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगारही देता आलेला नाही.त्यामुळे डबघाईस आलेल्या युएनआयला वाचविण्यासाठी चेअरमन विश्वास त्रिपाठी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक निवेदन प्रसिध्द केले असून युएनआयसाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे.युएनआयच्या गेल्या तीस वर्षातला घाटा 23.67 कोटी रूपयांचा असल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे.

जय महाराष्ट्रच्या कॅमेरामनवर हल्ला


dilip rai-2

शिवसेना आणि मनसे यांच्या भांडणाचा मोठा तडाखा आज मिडियालाच बसला.जय महाराष्ट्र या वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिस्ट दिलीप राय दंगलीची कव्हरेज करीत असताना त्यांनाच मारहाण करण्यात आली.त्यात ते जखमी झाले आहेत. शुक्रवारी निवडणूक आयुक्तांना निवेदन देवून आरोपीवर कडक कारवाही करण्याची मागणी केली जाणार असल्याचे विविध पत्रकार संघटनांनी सांगितले आहे. 


प.बंगालमध्ये पत्रकारांवर हल्ला

एका न्यूज चॅनलच्या महिला पत्रकाराचा फोटो बस चालकाने आपल्या मोबाईलमध्ये घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला विचारणा करणाऱ्या महिला पत्रकारास असभ्य वागणूक दिली गेली आणि तिच्या बचावासाठी आलेल्या अन्य पत्रकारांनाही बस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली.याची तक्रार पोलिसात दिली असली तरी अजून कोणाला अटक केली गेलेली नाही.

Thursday 3 April 2014

पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर सदानंद शिंदे



मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि दै. 'नवाकाळ'चे विशेष प्रतिनिधी सदानंद शिंदे यांची मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद शिंदे हे १९८४ पासून पूर्णवेळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. 'श्री' आणि 'प्रहार' या साप्ताहिकाच्या संपादकपदाची धुरा सांभाळल्यानंतर सागर, रत्नागिरी टाइम्स या दैनिकांतही त्यांनी काम केले. १९९५ पासून दै. नवाकाळचे मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.

Wednesday 2 April 2014

खंडणीची मागणी करणार्‍या पत्रकाराला नवी मुंबईत अटक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या एलबीटी विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे वर्तमानपत्रात छापून बदनामी करण्याची धमकी देत उपायुक्त सुधीर चेके यांच्याकडे १४ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्‍या पत्रकाराला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. दिनकर सोनकांबळे असे या खंडणीखोर पत्रकाराचे नाव असून तो 'विश्‍वपथ' या साप्ताहिकाचा संपादक आहे. 

शासनाच्या पुरस्कार योजनेकडे पत्रकारांनी फिरविली पाठ

महाराष्ट्र सरकारच्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालयनालयातर्फे दिल्या जात असलेल्या ( हे पुरस्कार 1910 पासून दिलेच गेले नाहीत ) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारास प्रतिसाद न मिळाल्याने महासचालनालयालावर प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवली आहे.यापूर्वीच्या पत्रकानुसार पत्रकारांकडून 31 मार्चपर्यत प्रवेशिका मागविण्यात आलेल्या होत्या मात्र स्पर्धेसाठी फारच कमी पत्रकारांनी प्रवेशिका पाठविल्याने आणि काही विभागातून तर एखादी-दुसरीच प्रवेशिका आल्याने प्रेवेशिका पाठवायला मुदतवाढ द्यावी लागली आहे.आता 30 एप्रिलपर्यत या प्रवेशिका पाठविता येतील.असे माहिती विभागाने पत्रकाव्दारे कळविले आहे.