Tuesday 28 October 2014

दिवाळी अंक स्पर्धा

"मराठी वृत्तपत्र लेखक संघ" मुंबई च्या वतीने ३८ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. आपल्या प्रकाशित दिवाळी अंकांच्या २ प्रती "मराठी वृत्तपत्र लेखक संघ", शिंदेवाडी महापालिका शाळा, पालव मार्ग, दादर पूर्व, मुंबई १४. या पत्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी रमेश सांगळे यांच्याशी ९८२१५७४८९२ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Monday 27 October 2014

पत्रकार अमलकुमार डे यांचे निधन

नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आणि व्यंगचित्रकार अमलकुमार डे (57) यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. त्यांच्यावर पश्‍चिम बंगालमधील राजगंज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 
नवी मुंबईतील "महानगरी एक्‍स्प्रेस‘ या हिंदी साप्ताहिकाचे संपादक राहिलेल्या डे यांनी नामांकित वर्तमानपत्रांत पत्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून काम केले. एस. मुखर्जी यांच्या तीन चित्रपटांचे ते सहदिग्दर्शक आहेत. डे यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मान्यवर लेखक, व्यंग्यचित्रकार व पत्रकारांनी डे यांच्या निधनानिमित्त शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Thursday 23 October 2014

‘वॉशिंग्टन पोस्ट’चे माजी संपादक ब्रॅडली यांचे निधन

वॉशिंग्टन पोस्टचे माजी संपादक बेंजामिन ब्रॅडली (९३) यांचे मंगळवारी निधन झाले. जगभरात गाजलेले वॉटरगेट प्रकरण उघड करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वॉशिंग्टन पोस्ट हे वर्तमान जागतिक दर्जाचे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अमेरिकेचे राजकारण हादरवणारे वॉटरगेट प्रकरण त्यांच्याच संपादकपदाच्या कारकिर्दीत घडले होते. 

Sunday 19 October 2014

मतमोजणीवर पत्रकारांचा बहिष्कार ?

निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांना फोटोग्राफी आणि व्हीडिओ शूटिंग करण्यास बंदी घातली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील पत्रकारानी मतमोजणीच्या वृत्त संकलनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.  मतमोजणीच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोबाइल, लॅपटॉप इत्यादीवरही बंदी घालण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि प्रसिद्धीमाध्यम यांना फोटो आणि व्हीडिओ शूटिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ आयोग आणि पोलिस विभागाला अशी परवानगी असेल. त्यामुळे पत्रकारांनी या मतमोजणीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला असल्याचे समजते. 


Saturday 18 October 2014

पत्रकार कक्षातील चोऱ्यांमुळे भुरट्या पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी

मुंबई महानगर पालिकेच्या पत्रकार कक्षामधून एका महिला पत्रकाराचा मोबाईल चोरी झाल्याने पत्रकार कक्षामध्ये सीसीटीव्ही लावण्याची तसेच पालिकेमध्ये येणाऱ्या भुरट्या पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी मुंबई महानगर पालिका पत्रकार संघ व जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र यांनी मुंबईच्या महापौर तसेच पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

Thursday 16 October 2014

पत्रकार आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद

भाजप कार्यकर्ते, पत्रकारांच्या वादावादीत वाराणसीतील मोदींच्या कार्यालयाचे उद्घाटन
वाराणसी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी उत्‍तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने भाजप कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये वाद झाले. यावेळी सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शहा यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले.

Tuesday 14 October 2014

मतदानापूर्वी जनमत चाचणीस मनाई

मतदानापूर्वी 48 तास निवडणूक प्रचार बंद झाल्यानंतर दूरचित्र वाहिन्या व वृत्तपत्रांमधून मतदारांवर प्रभाव टाकणारे वृत्त प्रसिद्ध करण्यास; तसेच कुठल्याही प्रकारची जनमत चाचणी प्रसिद्ध करण्यास जनप्रतिनिधी कायदा 1951 नुसार मनाई करण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होतील, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. 

राज ठाकरे पत्रकारांवर भडकले

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाद्वारे आयोजित एक वार्तालाप कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोमवारी आमंत्रित करण्यात आले होते. या वार्तालाप कार्यक्रमात राज ठाकरे यांना आपल्या सोयीचे असे प्रश्न विचारले जातील अशी अपेक्षा होती. परंतू पत्रकारांनी अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारले गेल्याने राज ठाकरे पत्रकारांवर चांगलेच भडकले.

Monday 13 October 2014

खंडणी उकळणा-या तोतया पत्रकारांना अटक

मुंबई : बनावट ओळखपत्राच्या आधारे हॉटेल चालकांकडून खंडणी उकळणा-या तोतया पत्रकारांना खार पोलिसांनी अटक केली. आठ जणांच्या या टोळीत एका महिलेचा देखील समावेश असून, त्यांनी कुलाब्यापासून दहिसरपर्यंत अनेक हॉटेलचालकांना तोतया पत्रकारांनी गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले. 

उमेदवारांनी पत्रकारांना खुश केले - " पेड न्यूज " रेट

महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका जाहीर झाल्या असल्याने " पेड न्यूज " वर बंदी घालण्यात आली आहे. " पेड न्यूज " वर बंदी असली तरी कायदा धाब्यावर बसवत पत्रकार, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यानी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. निवडणूकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यापासून वृत्तपत्रातून ( काही अपवाद वगळता ) जाहिरातीच्या दराप्रमाणे पेड न्यूज प्रसिध्द केल्या जात आहेत. वृत्तवाहिन्यांच्या ( काही अपवाद वगळता ) प्रतिनिधींनी दीड ते १५ लाखाचे प्याकेज घेवून उमेदवारांची प्रसिद्धी केली आहे. विशेष म्हणजे काही वृत्तपत्रांनी आम्ही पेड न्यूज घेत नाही अश्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणात पेड न्यूज प्रसिद्ध केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Saturday 11 October 2014

आर्थिक सेटिंगमुळे वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणात भाजपाला बहुमत ?

नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधान पदावर बसवण्यात वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडियाचा मोठा हात आहे. केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असे सर्वेक्षणात दाखवण्यासाठी भाजपाने काही वृत्तवाहिन्यांबरोबर आर्थिक सेटिंग केली आहे. या सेटिंग मध्ये कोणत्या वृत्तवाहिन्यांना किती रक्कम मिळाली याची जोरदार चर्चा सध्या पत्रकारांमध्ये आहे.

Saturday 4 October 2014

जेष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांचे निधन

महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांचे आज शनिवारी सकाळी ५.३० च्या सुमारास पुणे येथे निधन झाले. पाध्ये यांच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्या नंतरही त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्ष होते.

Wednesday 1 October 2014

निवडणुकीमध्ये वृत्तवाहिन्यांना अच्छे दिन आले

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवण्यात मिडियाचा मोठा रोल होता. विशेष करून सोशल मिडिया आणि वृत्तवाहिन्यांनी यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. यामुळे जर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकतात मग आपण आमदार का बनू शकत नाही अशी स्वप्ने महाराष्ट्रातील प्रत्तेक उमेदवाराला पडू लागली आहेत. यामुळेच वृत्तवाहिन्यांवर उमेदवारांच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी पेड न्यूज म्हणून लाखो रुपये उमेदवारांकडून घेतले जात असल्याने वृत्तवाहिन्यांना अच्छे दिन आले आहेत.

पत्रकार दीपक चव्हाण रोटरीच्या नेशन बिल्डर्स पुरस्काराने सन्मानित

सांगलीच्या वेश्या वस्तीत वेश्या महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करून वेश्या महिलांच्या जीवनात जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे आणि सिंगापूरच्या लायब्ररी मध्ये आपला ठसा उमठवणार्या पत्रकार दीपक भीमराव चव्हाण याना रोटरी इंडिया लिटरेसी मिशनच्या नेशन बिल्डर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्रामबाग येथील खुलेनाट्यगृहात आयोजित सोहळ्यात दीपक चव्हाण यांना गौरवण्यात आले.