Friday 27 March 2015

एका संपादिकेचे सांगणे..

कॅथरीन व्हायनर या ‘द गार्डियन’ या ब्रिटिश इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकपदी निवडल्या गेल्या आहे. हे वृत्तपत्र एका न्यासातर्फे चालविले जाते आणि या न्यासाच्या सदस्यांखेरीज काही महनीय व्यक्ती मिळून ८३९ जण संपादकांची निवड करतात. या ‘निवडणुकी’तील एक उमेदवार म्हणून व्हायनर यांनी केलेले हे भाषण.. जग बदलते आहे, तंत्रज्ञान बदलते आहे आणि पत्रकारितेच्या मूल्यांनाही आव्हाने मिळत आहेत.. त्याबद्दल संपादकपदावरील व्यक्तीचे विचार काय असावेत, याची चर्चा केवळ ‘गार्डियन’पुरती आणि त्या एका वृत्तपत्राभोवती मर्यादित राहू नये, या हेतूने इथे अनुवादित स्वरूपात ! 

Thursday 19 March 2015

‘प्रेस क्लब’साठी उल्हासनगरमधील पत्रकारांचा लढा !

उल्हासनगर- महापालिकेच्या मालकीच्या गोल मैदान येथील रोटरी मिडटाऊन सभागृह प्रसिद्धीमाध्यमांना ‘प्रेस क्लब’ म्हणून देण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत झाला आहे, मात्र काही नगरसेवकांनी या ठरावात फेरबदल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याने ठरावात फेरबदल झाल्यास प्रेस क्लबला जागा मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. 

उर्दू दैनिकाच्या संपादिकेला दिलासा - सीआयडी तपास करण्यास परवानगी

मुंबई : फ्रान्समधील चार्ली हेब्डो साप्ताहिकातील मोहमद पैगंबर यांच्या वादग्रस्त व्यंगचित्र पुन:प्रसिद्ध करून वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या उर्दू दैनिकाच्या संपादिकेला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या संपादिकेच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेले गुन्हे एकत्रित करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला तपास करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. तसेच संपादिका शिरीन दळवी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले.

Monday 16 March 2015

तोल ढळलेला मिडिया आणि संघ

'मिडियाचा तोल ढळला आहे', असे मी म्हणतो तेव्हा मिडियातील मित्रांसह अनेकांना स्पष्ट का बोलतो म्हणून माझा राग येतो . ( मग त्यातले काही मला काही दिवस च्यानलवर तोंड वाजवायला बोलवत नाही , मुद्रित माध्यमातले लेख मागत नाहीत ..असो, असो ) असे बोलणे हा माझा नाईलाज आहे . आणखी एक उदाहरण देतो - 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठे फेरबदल होणार , भय्याजी जोशी सरकार्यवाहपदावरून जाणार' आणखी काय होणार आणि त्यांचे जागतिकपातळीवर पडसाद कसे उमटणार अशा बातम्या अलिकडे प्रकाशवृत्त वाहिन्या ( म्हणजे आपला 'इलेक्ट्रॉनिक्स मिडिया' हो !) आणि मुद्रित माध्यमांत अत्यंत ठळकपणे झळकल्या . प्रत्यक्षात भय्याजी जोशी यांची तिसऱ्यांदा सरकार्यवाहपदी निवड झाली...कारण ती होणारच होती . संघाविषयीचे जाणकार असणारे आणि संघाचे बीट गंभीरपणे कव्हर केलेल्यां पत्रकारांना संघात कोणतेही बदल होणार नाही हे माहिती होते . 

वृत्तपत्राकडे विकासाचे साधन म्हणून पाहिले पाहिजे - राधाकृष्ण नार्वेकर

वसई : स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही देशातील जनतेचे मूलभूत प्रश्न कायम आहेत. पत्रकारांनी वृत्तपत्रे ही बातम्या प्रसिद्धीची साधने न मानता विकासाची साधने मानली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व दै.'पुण्य नगरी'चे सल्लागार संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनी विरार येथे बोलताना केले. 

डीडीच्या वरिष्ठ अधिका-यावर लैंगिक शोषणाचा आरोप

नवी दिल्ली, दि. १५ - प्रसारभारतीच्या डीडी वाहिनीत काम करणा-या एका महिलेने वाहिनीच्या वरिष्ठ अधिका-यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या वरिष्ठ अधिका-याविरोधात तक्रार केल्यावर पिडीत महिलेची दुस-या कार्यालयात बदली करण्यात आली असून पोलिसही तक्रार दाखल करत नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. 

मजीठिया मामले पर सुप्रीम कोर्ट गंभीर, 28 अप्रैल को अंतिम फैसला

दिल्ली : सर्वोच्च न्‍यायालय ने अखबार मालिकों द्वारा अपने कर्मचारियो को मजीठिया वेज बोर्ड का लाभ न देने के मामले को गंभीरता से लिया है। न्यायालय ने कर्मचारियों की ओर से दायर याचिका मंजूर कर सभी अखबार मालिकों को 28 अप्रैल 2015 तक अपना पक्ष रखने का निर्देश दिया है। मामले पर 'अगली और अंतिम' सुनवाई 28 अप्रैल 2015 को होगी और उसी दिन फैसला सुना दिया जाएगा। सुप्रीम कोर्ट ने आगाह किया है कि उसके बाद कोई सुनवाई नहीं होगी।

Sunday 8 March 2015

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा ‘प्रादेशिक वृत्त विभाग’ देशात सर्वोकृष्ट

औरंगाबाद (प्रतिनिधी):- आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची २०१३ च्या ‘सर्वोत्कृष्ट वृत विभाग’;पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाचे महासंचालक श्री. मोहन चांडक यांनी एका पत्राद्वारे ही निवड झाल्याचे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राला कळविले आहे. देशभरातील ४८ प्रादेशिक वृत्त विभागातून ही निवड करण्यात आली आहे, असे औरंगाबाद आकाशवाणी कार्यालयाचे प्रादेशिक वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी सांगितले.

पत्रकार हा समाजाचा खरा मार्गदर्शक

सिंधुनगरी- पत्रकार हा शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहिला पाहिजे. पत्रकारांचे समाजातील अस्तित्व टिकविण्यासाठी, त्यांच्याबद्दल आदराची भावना राहण्यासाठी पत्रकारांनी आपल्या आचारसंहिता पाळल्यास समाजाला खरा मार्गदर्शक म्हणून पत्रकार समाजात चांगले स्थान निर्माण करेल असे प्रतिपादन दै. प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या दोनदिवशीय स्नेहमेळावा व शिबिरात ते बोलत होते. 

Saturday 7 March 2015

अखबारों का पेशेवर होना समाज के लिए घातक

आज अखबार इस तरह से पेशेवर हो गए हैं कि समाज के लिए घातक बनते जा रहे हैं। मीडिया में पिछले ढाई दशक से होने के बावजूद मुझे यह लिखने में कत्तई संकोच नहीं कि बड़े-बड़े अखबार चंद सिक्कों की खातिर देश और समाज के साथ खिलवाड़ कर रहे हैं। ऐसा आज लिखना पड़ रहा है तो इसके पीछे बहुत बड़ा कारण है। 

Thursday 5 March 2015

भाजपाच्या माजी सभापती व दोन मुलांनी पत्रकाराच्या कुटुंबावर केला प्राणघातक हल्ला

सुरेश काटे गेल्या  दहा वर्षा पासून पत्रकार या क्षेत्रात  कार्यरत  आहे. काटे यांनी कल्याण डोंबिवली या भागात सहा सात वर्षां पासून विविध वृत्तवाहिनीत काम केले आहे. कल्याण डोंबिवली मधील अनेक अनेक प्रकारणे काटे यांनी उघड केली आहे. त्या बातम्यांचा परिणाम पोलिसांनवर खूप मोठ्या प्रमाणात झाला. या कामाची खून्नस पोलिसांनी काटे यांच्या नातेवाईकांना हाताशी धरून कौटुंबिक वादाचे स्वरूप देवून 2013 साली 354 या खोट्या आरोपात काटे यांच्यावर गुन्हा दाखल केला.पुन्हा पैशाच्या जोरावर आमच्या फॅमिलीवर 27 फेब्रुवारी 2015 ला 498 हा गुन्हा  काहीही  चौकशी न करता  दाखल केला.