Monday 25 May 2015

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारांना आवाहन

मुंबई - ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या वतीने वर्धापनदिनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव करण्याच्या दृष्टीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार’ हा शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. गेल्या वर्षभरातील वैशिष्टय़पूर्ण प्रकरणे उजेडात आणण्याविषयी केलेल्या बातमीला हा पुरस्कार देण्यात येतो.

Thursday 21 May 2015

मुख्यमंत्र्यांचे मीडियाला टोले

मुंबई  - एखाद्या विषयावर मतमतांतरे असू शकतात, पण याचा अर्थ सरकारमध्येच मोठा वाद आहे असा होत नाही. मी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियमित संपर्कात असतो आणि त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद होत असतो. त्यामुळे आमचं बरं चाललंय हे लक्षात घ्या, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला लगावला.

Wednesday 20 May 2015

सोशल मिडियातील पत्रकारितेलाही आता राज्य शासनाचा पुरस्कार

मुंबई : प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवी माध्यमे निर्माण झाली असून, अभिव्यक्तीसाठी सोशल मिडीया व ई-माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाकडून सोशल मिडियातील पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. 41 हजार रूपये, मानचिन्ह व  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.              

मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं व्दैवार्षिक अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून रोजी

मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं व्दैवार्षिक अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्‌घाटन होत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे समारंभाचं अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. देशभरातून अडीच हजार मराठी पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात संपन्न होत असलेल्या या अधिवेशनात दोन दिवस चर्चासत्र,परिसंवाद,मुलाखती असे विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहेत.पत्रकारिता,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर अधिवेशनात विविध विषयांवर आपल्या भूमिका मांडणार आहेत अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे संयोजक एस.एम.देशमुख, यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

Wednesday 13 May 2015

कार अपघातात पत्रकार प्रियंका डहाळेंचा मृत्यू

नाशिक : आपल्या साहित्यविषयक लेखनाने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केलेल्या युवा पत्रकार प्रियंका डहाळे (३0) यांच्यासह अन्य दोघे महामार्गावरील शहरानजीकच्या पाथर्डी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ठार झाले. 

Tuesday 12 May 2015

दैनिक दक्षिण मुम्बई के कार्यकारी संपादक सुमंत मिश्र लड़की के साथ छेड़ छाड़ के आरोप में हुए गिरफ्तार ।

मुम्बई। बीते बुधवार दैनिक दक्षिण मुम्बई के कार्यकारी संपादक सुमंत मिश्र विनय भंग (सेक्सुअल हरासमेंट) के आरोप में आईपीसी की धरा 354 A के तहत ताडदेव पुलिस द्वारा गिरफ्तार किये गए थे। हालांकि की 10000 रुपये नकद देकर उन्हें ज़मानत मिल गयी है।

Sunday 10 May 2015

आप करणार प्रसारमाध्यमांवर कारवाई

नवी दिल्ली - मुख्यमंत्री किंवा सरकारची प्रतिमा मलिन करणारी कोणती बातमी तुमच्या निदर्शनास आली तर, तुम्ही प्रधान सचिवांकडे तक्रार दाखल करा असे निर्देश दिल्लीतल्या आप सरकारने आपल्या अधिका-यांना दिले आहेत.  

पत्रकार संघाची फसवणूक करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा दाखल

ठाणे येथील गावदेवी मैदानाजवळील सरकारी भूखंडावर उभारलेले पत्रकार भवन गेल्या २२ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून त्याच्या पुनर्विकासाच्या नावाखाली पत्रकार, इतर विकासक आणि सरकारची घोर फसवणूक करणारा ठेकेदार राजन शर्मा व त्याचा भाऊ यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

दैनिक प्रजावाणीनं खोडवेकरांची खोड मोडली...

नांदेड येथील दैनिक प्रजावाणीनं जनहिताच्या काही बातम्या छापल्या पण त्या आपल्या विरोधात असल्याची समजूत करून घेत नांदेड मनपाचे आयुक्त सुशील खोडवेकर यांनी प्रजावाणीच्या जाहिराती बंद कऱण्याचा एकतर्फी निर्णय़ घेतला .हा निर्णय़ घेताना त्यांनी कोणतंही कारण दिलं नव्हतं.मनपानं जाहिराती बंद केल्यानं प्रजावाणीचं फार काही बिघडणार नव्हतं.त्यामुळं मुद्दा केवळ  जाहिराती बंद करण्याचा नव्हताच,मुद्दा होता तो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा,आर्थिक नाकेबंदी करून वृत्तपत्रांचा आवाज बंद कऱण्याच्या प्रय़त्नाचा.

Wednesday 6 May 2015

संपूर्ण" मीडिया'च्या विपश्‍यनेची गरज

नवी दिल्ली - संपूर्ण मीडियाचीच विपश्‍यना करण्याची गरज असल्याचे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज (5 मे 2015) व्यक्त केले. 

Monday 4 May 2015

गो होम इंडियन मीडिया - - नेपाळी जनतेचा संताप

नवी दिल्ली - नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपाच्या जखमा भळभळत असताना आणि या तीव्र दुःखातून तेथील जनता सावरण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र भूकंपाचे कव्हरेज करताना असंवेदनशीलतेचा कळस गाठला, असा संताप नेपाळी जनतेने ट्विटरवर व्यक्त केला. काल दिवसभर #GoHomeIndianMedia हे ट्रेंडिंग ट्विटरवर होते. रविवारी दिवसभरात सुमारे १ लाख ४४ हजार ट्विट पडले होते. 

Friday 1 May 2015

महिला पत्रकाराशी भेदभाव

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्‍या स्वामी नारायण मंदिराच्या कार्यक्रमात महिला पत्रकाराशी भेदभाव करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा समाजाच्या अनेक थरांतून निषेध झाला आहे. पत्रकार संघटनांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे.