Sunday 28 June 2015

महिला पत्रकारों के लिए बना वूमेन्स जर्नलिस्ट एसोसिएशन

महिला पत्रकारों के अधिकारो की लड़ाई के लिए मुंबई में ' वूमेन्स जर्नलिस्ट एसोसिएशन' की स्थापना की गई है । इस बात की जानकारी संस्था सचिव पूनम अपराज ने दी है । 

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देवदास मटाले यांची तिसऱ्यांदा निवड

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत देवदास मटाले सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. शशिकांत सांडभोर यांच्या परिवर्तन प्यानलमुळे यावेळची निवडणूक चुरशीची झाली होती. निवडणुकीमध्ये परिवर्तन प्यानलचे कार्यकारणीमध्ये ५ आणि विश्वस्त पदावर एक उमेदवार निवडून आला असताना इतर पदावर मात्र मटाले गटाचेच वर्चस्व राहिले आहे. परिवर्तनचे शशिकांत सांडभोर यांनी मटाले यांना चांगलीच टक्कर दिली असली तरी सांडभोर यांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष पदासाठी मटाले यांना १७०, सांडभोर यांना १३२, मोकाशी यांना ६९ तर वाभळे यांना ६४ मते मिळाली.

Saturday 27 June 2015

पत्रकार संघ निवडणुक - बांदल, मोकाशी, झवर... ५० हजारांचं काय झालं ?

मारुती कांबळेचं काय झालंअसा प्रश्न सामना चित्रपटात आहे, तसंच 50 हजारांचं काय झालंअसा प्रश्न मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं विचारला जात आहे.

पत्रकार संघाच्या ‘खुर्ची’साठी ठेचण्याची भाषा !

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, शनिवारी मतदान होत असून मतदानाला अवघे काही तास शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या वेगवेगळ्या गटांकडून एकमेकाला ठेचण्याची भाषा केली जात असून एरवी राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा करणाऱ्या सर्वसामान्य पत्रकारांमध्ये आपल्याच सहकाऱ्यांच्या घोटाळ्यांची चर्चा रंगली आहे.

Friday 26 June 2015

मुंबई मराठी पत्रकार संघात १०० टक्के परिवर्तन

शनिवारी २७ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक होत आहे. गेले काही दिवस पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्यात येत आहे. या प्रचारा दरम्यान कित्तेक आरोप प्रत्यारोप होता आहेत. सध्याचे अध्यक्ष देवदास मटाले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मला एक संधी द्या अशी विनवणी करत गेले ४ वर्षे पत्रकार संघाचे अध्यक्ष असणाऱ्या मटाले यांना पत्रकार संघासाठी निधी जमवता आला नसल्याने पत्रकार संघाच्या बँकेमधील ठेवी मोडून इमारत दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. पत्रकार संघाच्या इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि आपल्या मर्जीतील एका व्यक्तीला धर्मादाय संस्था असलेल्या पत्रकार संघात ४५ हजार रुपये पगार दिल्याचा आरोप मटाले यांच्यावर आहे. सध्या या ४५ हजाराच्या नोकराला आरोप झाल्याने काढले असल्याचे वृत्त आहे. सध्याचे अध्यक्ष असलेले मटाले यांची अशी प्रकरणे निवडणुकी मध्ये गाजत असतानाच या आधीही अध्यक्षपद भूषवलेले प्रसाद मोकाशी, नरेंद्र वाबळे या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. माजी अध्यक्ष असलेल्या मोकाशी यांच्यावर तर स्वताचे प्यानल बनवताना दुसऱ्या प्यानलचे उमेदवार पळवल्याचा आरोप झाला आहे. अश्या पळवापळवी केलेल्या उमेदवारांनी आम्ही तुमचे उमेदवार नाहीत अशी तंबी मोकाशी यांना दिल्याने माजी अध्यक्ष मोकाशींना किती लोकांचा पाठींबा आहे जग जाहीर झाले आहे. 

सोशल मीडियातील लेखनासाठीही पत्रकारिता पुरस्कार

मुंबई -  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार याबरोबरचआता सोशल मीडियातील लेखनासाठीही पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2014पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2015असा आहे.

Thursday 25 June 2015

"मुंबई मराठी पत्रकार संघ" की राजकीय आखाडा ?

अमृतमहोत्सवी परंपरेचा वारसा सांगणाऱ्या 'मुंबई मराठी पत्रकार संघा'च्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे यंदाही शह-काटशहाचे जोरदार वारे वाहू लागले असून, येत्या २७ जून रोजी होणाऱ्या मतदानानंतर 'सत्तेची सुवर्णसंधी' मिळविण्यासाठी पत्रकारांमधील गटातटांनी कंबर कसल्याने मुंबईच्या मराठी पत्रकारविश्वात आणीबाणीसदृश परिस्थिती उद्भवली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या शिदोरीवर मतांचा जोगवा मागणाऱ्या पत्रकांचा मारा सदस्यांवर सुरू झाला असून अचंबित करणारी आश्चर्यदेखील या गदारोळात उघडय़ावर येऊ लागली आहेत. कसलेल्या राजकीय पक्षांनाही मागे टाकणाऱ्या टोकाच्या प्रचारामुळे, पत्रकार संघात निवडून येण्याने नेमके साधते काय, असा भाबडा प्रश्न नवख्या मराठी पत्रकारांच्याच नव्हे तर नागरिकांच्या मनातही रुंजी घालू लागला आहे.

Wednesday 24 June 2015

पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीणार : राज्यपाल

पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत आपणही चिंतीत असून राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याबाबत शासनाने विचार करावा, या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे आश्वासन राज्यपाल चे विद्यासागर रावयांनी आज दिले. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या एका 15 सदस्यीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार दि २३) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

Tuesday 23 June 2015

पत्रकारो पर जुल्म - चलो दिल्ली 25 को

रोज पुरे भारतबर्ष में  हो रहे है हर दिन पत्रकारो को जिन्दा जलया जा रहा है , मारा जा रहा है पीटा जा रहा है पत्रकारो के घर बालो को डरया जा रहा है धमकाया जा रहा पत्रकारो को और उनके परिवार के लोगो को फर्जी मुकदमो में फसाया जा रहा है इसके पीछै पत्रकारो का सच बोलना और सच लिखना कुछ लोगो को पसन्द ना आना है अगर यही हाल रहा तो जल्द सच नहीं टोटल झूठ छपेगा झूठ दिखेगा और सच को बोलने लिखने की हिम्मत कोई नहीं करेगा आज जब हम पूरी दुनिया में देखते है तो पाते है की पूरी दुनिया में सबसे ज्यदा खराब हालत इंडिया में है पत्रकारता की इसके लिए कभी नेता कभी माफिया तो कभी हम खुद जिमेदार है जो इतने सालो में आज तक एक नहीं हुए अगर हम अब भी एकता से नहीं जुड़े तो शायद हम बिखरने के लिए बचे ही नहीं और