Friday 28 November 2014

सर्कुलेशनच्या खोट्या आकडेवारीद्वारे सरकारी तिजोरीची लुट

उत्तर प्रदेश - भ्रष्टाचाराबाबत ओरड करणारा आणि अश्या बातम्यांना मिर्ची मसाला लावून आपल्या वाचकांना आकर्षित करणारा लोकशाहीचा चौथा स्थंभ किती भ्रष्ट आहे याचा अंदाजा सर्कुलेशनच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २०११ च्या जणगणने नुसार २० करोड आहे. या लोकसंखेपेक्षा कित्तेक पटीने अधिक काही दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक वृत्तपत्रांचे सर्कुलेशन असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संगणकात नोंद झाले आहे. सरकारी जाहिराती मिळवण्याच्या लालसेपोटी एक हजार हून अधिक वृत्तपत्रांनी असे प्रकार केले असले तरी या पैकी काही मोजकीच वृत्तपत्र बाजारात आणि लोकांच्या घरामध्ये दिसत आहे. 

दैनिक भास्कर मध्ये मजिठीया आयोगाचा लाभ न देता नोकरीवरून काढण्याच्या नोटीस

मैं दैनि​क भास्कर सागर संस्करण में डिप्टी न्यूज एडिटर के पद पर पदस्थ हूं। मैंने मजीठिया वेज बोर्ड में तहत भास्कर प्रबंधन को एक नोटिस दिया है। अभी तक प्रबंधन ने इस पर ​कोई संज्ञान नहीं लिया है। मजीठिया वेज बोर्ड का लाभ दिए बिना कंपनी ने 4 अक्टूबर को मेरा रिटायरमेंट तय कर दिया।
मैंने कंपनी से मजीठिया का लाभ दिए जाने के लिए की मांग की लेकिन कंपनी ने सुनवाई नहीं की। इसके बाद मैंने रिटायरमेंट के दस्तावेज पर हस्ताक्षर करने से इंकार कर दिया। मैंने कंपनी के खिलाफ माननीय सुप्रीम कोर्ट में अवमानना याचिका दायर करने का निर्णय लिया है। कृपया इस संबंध में उचित मार्गदर्शन दें ताकि मुझ ​सहित अन्य साथियों के साथ न्याय हो सके। कंपनी को दिए नोटिस की प्रति अटैच कर रहा हूं कृपया प्रकाशित कर कृतार्थ ​कीजिएगा।

Thursday 27 November 2014

हिसार लाठीहल्ल्यातील जखमी पत्रकार नुकसान भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयात


नवी दिल्ली - हरयाणा हिसार येथील सतलोक आश्रामामधून तथाकथित बाबा रामपाल याला पोलिसांकडून अटक करतानाचे वृत्तसंकलन करणारे पत्रकार विकास चंद्र यांची प्रकृती खालावली आहे. याच घटनेमध्ये जखमी झालेल्या इतर ४ पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून पत्रकारांना झालेल्या मारहाणीची आणि जखमी पत्रकारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मागणी केली आहे. 

Thursday 20 November 2014

परभणीत पत्रकारावर हल्ला

परभणी - दैनिक गावकरीचे पत्रकार मोहसीन खान यांच्यावर १९ नोव्हेंबरला जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही गुंडांना पोलिसानी तडीपार केल्यावर एक प्रेस नोट काढण्यात आली. प्रेस नोटच्या आधारे सर्वच वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. परंतू काही समाज कंटकांनी बातमी का दिलीस असे विचारात मोहसीन खान यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला.

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी पारदर्शकतेची गरज - भारतकुमार राऊत


पुणे : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सार्वजनिक पारदर्शकतेची नितांत गरज आहे. याचबरोबर माध्यमातही ही पारदर्शकता खोलवर रूजण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जेष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी येथे केले. 

पारदर्शकतेसाठी प्रसारमाध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करावे - कैलास म्हापदी


ठाणे : सार्वजनिक कामकाजात पारदर्शकता रुजावी म्हणून प्रसारमाध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन दै.जनादेशचे संपादक कैलास म्हापदी यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्यावतीने माहिती कार्यालय येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक शैलेश लांबे उपस्थित होते. 

व्यवस्था सुधारणेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची - धीरजकुमार

नांदेड : माध्यमांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. माध्यमांकडे सर्वसामान्य खूप अपेक्षेने आणि आशेने पाहतो. लोकांचा दबलेला आवाज, न सुटलेले प्रश्न यांच्यासह व्यवस्था सुधारणेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.

प्रसार माध्यमांनी पारदर्शक होण्याची गरज - गावकर


पणजी : 
माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आणि महत्त्चाचा खांब आहेत. हा खांब लोकशाहीच्या इतर तीन खांबांवर लक्ष ठेवण्याचे काम करतो. त्यासाठी माध्यमांनी पारदर्शक होण्याची गरज असल्याचे मत गुजचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा तर्फे आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. 

रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थाचे काम माध्यमांनी समाजापुढे आणावे - न्यायमूर्ती सिरपूरकर


नागपूर :
 ‘विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचे मोठे आव्हान सध्या माध्यम क्षेत्रापुढे आहे. अनिष्ठ बाबींवर तीव्र प्रहार करण्याबरोबरच समाजात रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीचे काम समाजापुढे आणायला हवे. या कृतीतूनच माध्यमक्षेत्र पारदर्शकतेकडे वाटचाल करु शकेल’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. 

Monday 17 November 2014

आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा 2014

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू रहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

Friday 7 November 2014

पनवेल येथे महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला

पनवेल येथील कर्नाळा टीव्हीच्या रिपोर्टट चेतना वावेकर यांच्यावर आज शुक्रवारी सकाळी पनवेल येथे प्राणघातक हल्ला कऱण्यात आला. वावेकर आपल्या गाडीतून कामावर जात असताना एक तरूण गाडीला आडवा आला.त्याने चेतना वावेकर यांच्या केसाला धरून त्यांना बाहेर काढले.अश्लिल शिव्या देत त्यांना मारायला सुरूवात केली.तेवढ्यात मारहाण कऱणाऱ्या तरूणाचा मित्र आला त्याने मग बाबूच्या काठीने  वावेकर यांच्या डोक्यावर वार केले आहेत. त्यात वावेकर गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार कऱण्यात येत आहेत.

Sunday 2 November 2014

सोनिया गांधींच्या जावयाकडून पत्रकाराला उद्धट वागणूक


जमीन घोटाळ्याप्रकरणी वादात अडकलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणखी एका प्रकरणाने गोत्यात आलेत. जमीन व्यवहारांच्या आरोपांवर टीव्ही रिपोर्टरने प्रश्न विचारताच वडेरा भडकले आणि त्याचा माईक झटकला. या घटनेवरून वडेरांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसने वडेरांची पाठराखण केली आहे. 

पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी सक्षम कायदे करण्याचा मानस - मुख्यमंत्री फडणवीस

पत्रकार आणि प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सक्षम कायदे करण्याचा मानस आहे. अन्य राज्यांच्या धर्तीवर पत्रकारांसाठी पेन्शन योजना राबविण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांचा मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाने सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.