Saturday 29 March 2014

पत्रकारांच्या अस्मितेला जेव्हा जाग येते….

sampat
मुंबई पेड न्यूजची राजधानीय असं बिनधास्त आणि एखादया राजकीय पक्षाच्या नेत्याला शोभावं असं विधान निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रम्हा यांनी काल मुंबईत केल्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर पत्रकारांची अस्मिता जागी झाली अन त्यांनी ब्रम्हा यांच्या टिप्पणीला जोरदार आक्षेप घेतला.आपली चूक लक्षात येताच ब्रम्हा यांनी दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकला.शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत हे नाट्य घडले.

पत्रकार तरूणीवर बलात्कार


gang

छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या एका पत्रकार तरूणीवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले आहे.आपल्याबरोबर शिकणाऱ्या एका तरूणावरच संबंधित तरूणीने बलात्काराचा आरोप लावला आङे.लग्न करण्याचे आमिष दाखवत संबंधित तरूण दीड वर्षे आपले शारीरिक शोषन करीत राहिला असा आरोप महिला पत्रकाराने न्यू राजेंद्र नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय.भूपेंद्र सिंह असे आरोपीचे नाव आहे.मार्च 2013 ते ऑक्टोबर 2013 या काळात अनेकदा आरोपीने तरूणीवर रेप केला.त्यानंतर तो लग्न करण्यास नकार देऊ लागला.त्यानंतर तरूणीने आपली ही कहानी आपल्या नातेवाईकाना सागितली.नंतर आरोपीवर 376,493 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वर्तमानपत्रं वाचू नका, टीव्ही पाहू नका - राष्ट्रवादीच्या आमदाराचा फतवा


fathva

वाहिन्यावरील सत्य विश्लेषण किंवा वर्तमानपत्रातील सत्य बातमीही आपल्या विरोधात जाणारी असेल तर ती कोणत्याच राजकीय नेत्यांना आवडत नाही.ते भडकतात,माध्यमांवर हल्ले करतात.माजलगावचे आमदार, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी आता वेगळाच मार्ग अवलंबिला आहे.सातत्यानं आपल्या विरोधात बातम्या येत असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यंाऩी वर्तमानपत्रंच वाचू नयेत असे आदेशच आता आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.याचा माजलगाव तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या आमदार सोळंकेच्या या वक्तव्याचा प्रखर शब्दात निषेध केला असून हा प्रकार लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाचा आवाज घोटण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन


KAUSHAL

पंजाबचे मुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या सभेेचे कव्हरेज करणयासाठी गेलेल्या महिला पत्रकार प्रोमिला क ौशल यांच्याबरोबर पोलिसांनी दुर्वव्यबहार केल्याची आमि त्यांना महिलापोलिसांकरवी धक्काबुक्की केल्याची तक्रार कौशल यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.डीएसपीच्या विरोधात कडक कारवाई करावी असे या महिला पत्रकाराचे म्हणणे आहे. बादल जेव्हा कपूरथळा येथे सभेसाठी आले तेव्हा त्यांचा बाईट घेण्यापासून कौशल यांना रोखण्यात आले.त्यांच्याशी डीएसपीने असभ्य वर्तन केले आणि असभ्य भाषा वापरली नंतर महिला पोलिसांना बोलावून त्यांना धक्काबुक्की करवविली असा आरोप आहे.

Tuesday 25 March 2014

पत्रकारांचे राजकीय पक्षांना आवाहन

पत्रकारांच्या प्रश्नंासंदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचा उल्लेख आपल्या जाहिरनाम्यातून करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने कॉग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आम आदमी पार्टी, शेकाप, माकपं आदि पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

पवारांचे माध्यमांवर टीकास्त्र


ncp

आजवर पंडित नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी यासारख्या नेत्यांची संपूर्ण भाषणे मीडियाने कधी ‘लाईव्ह’ केल्याचे पाहण्यात नाही. पण एका राजकीय पक्षाचे भाषण संपूर्ण टीव्ही मीडिया पूर्ण वेळ ‘लाईव्ह’ करीत आहे. याचा अर्थ वेगळा आहे. यातून वृत्तवाहिन्यांतही थैलीशाहीची संस्कृती रुजत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

आपच्या कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण

राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे दिसल्यानंतर एका पत्रकाराने त्यास जेव्हा विरोध केला तेव्हा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पत्रकारास लाथ्या बुक्कया आणि जोडयाने मारहाण केली.दिल्ली नजिक गुडवाव लोकसभा मतदार संघातील आप चे उमेदवार योगेंद्र यादव यांच्या प्रचाराच्या वेळेस धारूहेडा येथे ही घटना घडली.नंतर ही गोष्ट अरविंद केजरीवाल यांना कळल्यांनंतर त्यांनी माध्यमांची माफी मागितली.

Saturday 22 March 2014

रोबो जर्नालिझमची सुरुवात


LAT Quakebot
अगोदर प्रिंट जर्नालिझम, नंतर इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम, वेब जार्नालिझम आणि आता रोबो जर्नालिझमची सुरुवात होत आहे. म्हणजे बातम्या लिहिण्यासाठी आता मनुष्य पत्रकाराची गरज असणार नाही तर हे काम रोबो करणार आहे. अमेरिकेतील "द लॉस एजिल्स टाइम्स" या वृत्तपत्राने रोबो जर्नालिझमला सुरूवात केली आहे. या दैनिकाने रोबो पत्रकाराची कामं करणारा प्रोग्राम तयार केला आहे. 

छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणी शिक्षेचा फैसला सोमवारी



मुंबई : महालक्ष्मी येथील निर्जन शक्ती मिलच्या आवारात असहाय्य टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या चौघा नराधमांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि पाशवी स्वरूपाचा असल्याचे मत प्रधान सत्र न्यायाधीश शालिनी फणसळकर-जोशी यांनी शिक्षा सुनावताना व्यक्त केले. आणखी एका पीडित छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणी शिक्षेचा फैसला न्यायालय येत्या सोमवारी जाहीर करणार आहे. 

Friday 21 March 2014

शक्ती मिल प्रकरणांत आज शिक्षा सुनावणार



मुंबई : शक्ती मिलमध्ये इंग्रजी मासिकातील छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाच नराधमांना सत्र न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. या दोषींना न्यायालय आज (शुक्रवारी) शिक्षा सुनावणार आहे. 


ज्येष्ठ पत्रकार खुशवंत सिंग यांचे निधन



नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले पत्रकार-लेखक खुशवंत सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. वृद्धापकाळामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या खुशवंत सिंग यांनी राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. 

Thursday 20 March 2014

सोनपेठमध्ये सामनाच्या पत्रकाराला अमानूष मारहाण

परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील सामनाचे पत्रकार भागवत शंकर आप्पा पोपडे यांच्यावर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी काल रात्री आमानूष हल्ला केला. दहा ते पंधरा गुंडांनी हा हल्ला केला.

महिला पत्रकाराचा विनयभंग करणाऱ्यांना कोठडी - त्यानंतर जामिनावर मुक्तता


jia
मुंबई - हिंदी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अंधेरी पश्‍चिमेला व्ही. पी. रोड येथे युनायटेड सोसायटीजवळ सोमवारी (ता. 17) हा प्रकार घडला होता. 


मुंबईत महिला पत्रकाराची छेडछाड

jia
मुंबईत एका महिला पत्रकारावर झालेला बलात्कार,एका हॉटेलाच चार महिला पत्रकारांना दिली गेलेली असभ्य वागणूक आणि कर्नाटकात एका महिला पत्रकाराच्या शर्टचे बटन काढून तिला एका मंत्र्यांने विवस्त्र कऱण्याचा केलेला प्रयत्न या साऱ्या घटना ताज्या असतानाच काल होळीच्या दिवशी मुंबईत एका महिला पत्रकाराशी काही समाजकंटकांनी असभ्य वर्तन करून तिची छेडछाड केली.जिया न्यूज या वाहिनीची ही महिला पत्रकार आहे.अंधेरी भागात ही घटना घडली.

Tuesday 18 March 2014

महिला पत्रकारास विवस्त्र कऱण्याचा प्रयत्न


banglor
मुंबईत एका महिला पत्रकारावर सामुहिक अत्याचार झाल्याची घठना अजून विस्मृतीत गेलेली नसतानाच बंगलोरमधून आलेली बातमी संपूर्ण पत्रकार जगताची तळपायाची आग मस्तकाला घेऊन जाणारी आहे.ही घटना लाच्छानास्पद नव्हे तर पत्रकारिता बिकावू झाली आहे म्हणत बोंबा मारणाऱ्यांना विचार करायला लावणारीही आहे.

Monday 17 March 2014

मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू करणारे आसाम टि्‌‌रब्युन पहिले वृत्तपत्र

आसाम ट्रिव्युन या इंग्रदी दैनिकाचे आभार मानावे लागतील. पत्रकारांच्या वेतन निश्छितीसाठी नेमण्यात आलेल्या मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू करणारे ते देशातील पहिले वृत्तपत्र ठरले आहे. नवी वेतनश्रेणी लागू केल्याने आसाम टि्‌‌रब्युनमधील कर्मचारी आणि पत्रकारांच्या वेतनात 15,000 हजार रूपयाचे मासिक वृध्दी झाली आहे.

Saturday 15 March 2014

आपच्या कार्यालयासमोर पत्रकार निदर्शने कऱणार


ArvindKejriwal2

आपल्या वागण्या-बोलण्यातील दुटप्पीपणा चव्हाट्यावर येत असल्याचे पाहून पिसाळलेल्या आपच्या नेत्यांनी राजकीय विरोधक सोडून माध्यमांनाच आपले विरोधक समजत माध्यमांवर शाब्दिक  हल्ले सुरू केले आहेत.देशातील माध्यमं विकली गेली आहेत,माध्यमांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली जाईल इथ पासून सत्ता आल्यास माध्यमवाल्यांना तुरूंगात डांबण्यापर्यतची भाषा आपचे नेते वापरू लागले आहेत.पायाखालची वाळू सरकू लागल्याने आपच्या नेत्यांचा तोल सुटला असल्यानेच ते माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या वक्तव्याचा आणि माध्यमांना दिल्या जात असलेल्या धमक्यांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज निषेध केला आहे.

Monday 10 March 2014

पत्रकाराला बंद पिंजऱ्यातून न्यायालयात केले हजर


ppppppp

मिस्त्र चे पदच्यूत राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सीचे समर्थन करणारे अल जजिराचे पत्रकार फादेल फहमी आणि ऑस्ट्रेलियन रिपोर्टर पीटर ग्रेस्टी याच्यासह वीस जणांंंंंंना यांना आरोपी करण्यात आले असून याच्या विरोधात बंदी असलेल्या ब्रदरहुड या संघटनेला पाठिंबा दिल्याचा तसेच चुकीचे रिपोर्टिंग केल्याचा आरोप आहे.या सर्वांना शुक्रवारी बंद पिंजऱ्यातून न्यायालयात हजर करण्यात आले.

दिल्लीत पत्रकार पोलिसांचे टार्गेट


delhi polic

दिल्लीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पूर्णतः अपयशी ठरलेल्या दिल्ली पोलिसांनी सध्या दिल्लीतील पत्रकारांना आपले टार्गेट केले आहे.आपले काम करणाऱ्या पत्रकारांची मानगुट पकडणे पोलिसांनी पुरूषार्थ वाटायला लागला आहे.वरील छायाचित्रात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करणाऱ्या एका पत्रकार – छायाचित्रकाराची मानगुट पोलिसांनी पकडली. तेव्हाचे छायाचित्र

Sunday 9 March 2014

पत्रकाराला मारहाण - मानवाधिकार आयोगाची पोलिसांना चपराक

"सच कहू" चे पत्रकार संदीप कुमार यांना 17 ऑगस्ट 2012 रोजी पोलिसांनी अत्यंत बेकायदेशीररित्या ताब्यात घेत त्यांना पोलिस कोठडीत डांबून त्यांना बेदम मारहाण केली होती.त्यांना दोषी ठरविण्यासाठी त्यांच्या हातात जबरदस्तीने तलवार देऊन त्याचे फोटो देखील काढले होते. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला गेला आणि माध्यमकर्मींनी त्याविरोधात उग्र निदर्शनेही केली होती. या घटनेच्या विरोधात मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चौकशी अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले होते. 

पत्रकारांच्या एकजुटीपुढे पोलिस झुकले

पत्रकारांची एकजूट व्यवस्थेला कशी वाकायला लावते याचे उत्तम उदाहरण म्हणून कानपूरच्या एका घटनेकडे पहाता येईल.काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका कार्यक्रमात पत्रकारांवर लाठ्या चालविल्या होत्या.त्यात वैभव शुक्ला जखमी झाले होते.याविरोधात पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर झालेल्या प्रकाराबद्दल एसपी यशस्वी यादव यांनी पत्रकारांची दिलगीरी व्यक्त करीत चार पोलिसांंना सस्पेंन्ड केले होते.आता वैभव शुक्ल यांच्या उपचाराचा खर्च पोलिस करील अशी घोषणा एसपीनीं केली आहे.पत्रकारांच्या एकजुटीचा हा परिणाम आहे.

Saturday 8 March 2014

‘पेड न्यूज’वर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती

मागील विधानसभेच्या निवडणुकीत ‘पेड न्यूज’चे प्रकरण फार गाजले. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या प्रचारार्थ अशा ‘पेड न्यूज’ दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवर झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत, अंकुश लावण्यासाठी समित्या गठित केल्या आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून, महाराष्ट्रात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

पत्रकार उपदेवांकडे नऊ हजार पेनांचा संग्रह


अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलतीच्या दरात बेस्ट बसपास

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलतीच्या दरातील बसपास देण्याचे आश्‍वासन शिवसेना-भाजपा- युतीने मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते त्यानुसार अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बेस्टच्या सवलतीच्या दरातील बसपास योजनेचा शुभारंभ नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. 

Thursday 6 March 2014

पेड न्यूजला गुन्हा ठरविण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

पेड न्यूजला गुन्हा ठरविण्याबाबतचा प्रस्तावर निवडणूक आयोगाने सरकारकडे ठेवला आहे.
तसेच निवडणूकांदरम्यान प्रचाराच्या खर्चावर लक्ष ठेवत निवडणूक आयोग स्वतःही
समस्या सोडवण्याचे प्रयत्न करणार आहे.

Tuesday 4 March 2014

पत्रकारांवर पोलिसांचा हल्ला

बातमी संकलनाचे काम करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी केलेल्या निर्मम हल्लयाच्या विरोधात कानपूरमधील पत्रकारांनी शनिवारी भव्य मोर्चा काढला. अखिलेश यादव यांच्या नावे पोलिसांना दिलेल्या निवेदनात दोषींवर कारवाई कऱण्याची मागणी करण्यात आली आहे.जखमी पत्रकार आणि छायाचित्रकारांना योग्य तो मोबदला देण्याचीही मागणी केली गेली आहे.पत्रकारांनी यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली.


Monday 3 March 2014

निवडणूक जाहिरातीला ‘सेन्सॉर’चा चाप


निवडणूक जाहिरातीला ‘सेन्सॉर’चा चाप, राज्य समितीकडून घ्‍यावी लागणार मंजुरी

वर्तमानपत्रांत किंवा दूरचित्रवाणीवर जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी उमेदवाराने राज्य किंवा जिल्हास्तरीय समितीकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे. मंजुरी न घेता जाहिरात प्रसिद्ध केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा रविवारी भारतीय निवडणूक आयोगाचे महासंचालक पी. के. दाश यांनी दिला.