Wednesday 29 April 2015

ज्ञानेश महाराव यांना डॉ. ग. गो. जाधव पुरस्कार

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पुरस्कार यंदा साप्ताहिक 'चित्रलेखा'चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांना जाहीर झाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने मंगळवारी ही घोषणा केली. पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ पत्रकाराचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार महाराव यांची निवड केली. महाराव यांना येत्या मे महिन्यात पत्रकार भवनात होणार्‍या समारंभात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

ठाण्यात रिक्षाचा अपघात घडवून महिला पत्रकाराला मारण्याचा प्रयत्न

ठाणे : ठाण्यात एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकारासोबत मीटरवरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाने रिक्षा भरधाव वेगाने चालवून घोडबंदर रोड येथे उभ्या असलेल्या गाडीला रिक्षाची धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षा चालकासह महिला पत्रकारदेखील जखमी झाली. यामुळे स्वप्नाली लाड प्रकरणा नंतरही रिक्षाचालकांची अरेरावी सुरूच असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला आहे. 

रस्ते अपघातात सहा पत्रकार ठार

उत्तर प्रदेशमधील यमुना एक्स्प्रेस वेवर रविवारी (२६ एप्रिल) रात्री झालेल्या दोन विभिन्न अपघातात सहा पत्रकारांना प्राण गमवावा लागला. यामध्ये मुंबईतील खाजगी वाहिनीतील दोन पत्रकारांचा समावेश आहे. विकास सिंग (४0) आणि मीनांग सालोकर (२८) अशी मुंबईतील, तर दिव्यांशू (३0), मनोज कुमार (२७), नुकूल शुक्ला (३३) आणि उमेश कुमार सिंग (३५) ही दिल्लीतील पत्रकारांची नावे आहेत.

Monday 27 April 2015

पत्रकार नामदेव गरुड यांचे निधन



डहाणू : दै. 'पुण्य नगरी' पालघरचे वार्ताहर, पत्रकार नामदेव गरुड याचे रविवार, २६ एप्रिल २0१५ रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्याच्या पश्‍चात मुलगा सुधीर, दोन विवाहित मुली आणि पत्नी, असा परिवार आहे.

औरंगाबाद शहरातील पत्रकार संघ कोणासाठी ?

औरंगाबाद शहरातील स्व. प्रमोद महाजन मराठी पत्रकार भवनामध्ये शहरातील विविध दैनिकांच्या युवा पत्रकारांनी एकत्र येऊन अभ्यास वर्ग सुरू केला. त्यास आज 26 एप्रिल रोजी 3 महिने पूर्ण झाले. वेगवेगळ्या विषयांतील तज्ञ, अभ्यासक आतापर्यंत येथे हजेरी लावून गेले. आजच्या अभ्यास वर्गात खैरलांजी, सोनई, खर्डा व जवखेड्यासह महाराष्ट्रभर घडलेली जातीय अत्याचारांची प्रकरणे हाताळणारे कार्यकर्ते केशव वाघमारे यांचे 'जातीय अत्याचार आणि वास्तव' या विषयावर भाषण आणि सादरीकरण झाले. परंतु आजच्या अभ्यास वर्गासाठी पत्रकार भवनाची चावीच मिळाली नाही. त्यामुळे पत्रकार भवनाच्या ओसरीत हा कार्यक्रम घ्यावा लागला. 

आणखी एका तरूण पत्रकाराचा अवेळी मृत्यू

सामनाचे पालघर येथील तरूण पत्रकार नामदेव गरूड याचं ह्रदयविकारानं निधन झालं आहे.धक्का देणारी ही बातमी आहे.अर्थात ही घटना पहिली नाही.मध्यंतरी लोणावळा येथील प्रवीण कदम नावाच्या तरूण पत्रकाराचा असाच ह्रदयविकारानं मृत्यू झाला होता.अशी एखादी बातमी आली की,आपण काय करतो आरआयपी हे तीन अक्षर टाइप करतो,थोडा वेळ असेल तर फुलं वाहतो आणि इतिकर्तव्य सपल्याचं समाधान मानत हॉटसंऍप वरील अन्य मेसेज वाचत बसतो.मात्र एखादा तरूण पत्रकार जातो तेव्हा त्याचं कुटुंब रस्त्यावर येतं हे आपण विसरतो,विसरलो नाही तरी त्यासाठी काही करीत नाही.मध्यंतरी औरंगाबादचा पत्रकार रमेश राऊत स्वाईन फ्लयूनं गेला.कुटुंबाची वाताहात झाली.कोणी मदतीला आलं नाही.नाही सरकार,नाही पत्रकार.असं अनेकांच्या बाबतीत घडतं. 

ठाण्यातील पत्रकार भवनाची जागा विकणाऱ्या बिल्डरला महसूल मंत्र्यांचे संरक्षण

ठाणे, २५ (प्रतिनिधी) - ठाण्यातील पत्रकार भवनासाठी दिलेल्या सरकारी जमिनीचा मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार करून पत्रकार भवन आजतागायत पत्रकारांच्या ताब्यात दिलेला नाही. उलट विकासकाने सदरची सरकारी जमीन व पत्रकार भवन विक्रीसाठी काढले आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनात आणून दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे,  विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी सकारात्मक भूमिका घेत कारवाईचे निर्देश दिले. मात्र सरकारी जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही कारवाई रोखल्याच्या कृतीचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने निषेध केला अशी माहिती अध्यक्ष संजय पितळे यांनी दिली आहे. 

Friday 24 April 2015

पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत वैद्यकीय शिबीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे शनिवार, २५ एप्रिल २0१५ रोजी सकाळी १0.00 ते सायंकाळी ४.00 या वेळेत पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर पत्रकार भवन, तिसरा मजला, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होईल. या शिबिराचे उद््घाटन डॉ. तात्याराव लहाने (संचालक आणि अधिष्ठाता, जे. जे. समूह रुग्णालय) यांच्या हस्ते सकाळी १0.00 वाजता होईल. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी, इको कार्डिओ इत्यादी चिकित्सा होतील. तरी संबंधितांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

विज्ञापनों को तरसता एक दलित चैनल

नागुपर में रहने वाले राजू मून और सचिन मून दोनों भाई हैं और केबल ऑपरेटर हैं. लेकिन साथ ही वो एक सैटेलाइट चैनल के मालिक भी हैं. इस चैनल का नाम है ‘लॉर्ड बुद्धा टीवी’ जो राजू मून के अनुसार भारत का पहला ऐसा चैनल है, जो गौतम बुद्ध और दलितों के मसीहा कहे जाने वाले डॉ. अंबेडकर के विचारों और संस्कारों का प्रसार करता है.

Monday 20 April 2015

'वाचकांच्या वृत्तपत्रावरील श्रद्धेशी प्रतारणा करू नये ' - भारतकुमार राऊत

मुंबई - वाचक हा छोट्या वृत्तपत्रांवर श्रद्धा बाळगतो. त्यावर निष्ठा ठेवतो. त्यामुळे वाचकांच्या श्रद्धेशी प्रतारणा करू नका, असे आवाहन माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी "मावळ मराठा‘ साप्ताहिकाच्या वर्धापन दिनी व्यक्त केले. "सकाळ‘च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांचा "मावळ मराठा‘ पुरस्काराने या वेळी सन्मान करण्यात आला. 

Friday 17 April 2015

मुंबईत दैनिक सामनाचे अंक जाळले

मुंबई - मुस्लिमांची नसबंदी करा मुस्लिमांचा मताधिकार रद्द करा अश्या मागण्या करत त्याबाबत ज्वलंत लिखाण करणारे शिवसेना खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची खासदारकी रद्द करावी आणि सहा वर्षे त्यांना कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी गुरुवारी (ता. 16) केली. राऊत यांच्या मागणीच्या निषेधार्थ पक्षाने गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले आणि दैनिक सामनाचे अंक जाळले. या वेळी प्रवक्ते कादिर चौधरी, महापालिकेतील गटनेते रईस शेख, रुक्‍साना सिद्दिकी, आदिलखान आझमी तसेच समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. 

6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे 40 वे अधिवेशन

पिंपरी-चिंचवड, दिनांक 17 (प्रतिनिधी)  75 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे 40 वे अखिल भारतीय अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून 2015 रोजी पुणे जिल्हयात पिंपरी-चिंचवड येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख आणि सरचिटणीस संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Thursday 16 April 2015

तरुण भरतच्या दिव्या खाली अंधार - 7 महीने काम पगार मात्र शून्य

आज पर्यंत तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील पण ही बातमी वाचून तुम्हाला पत्रकार होण्याची लाज वाटेल मराठी माणसाच्या हितासाठी अनेक पक्ष लढत आहे पण मराठी पत्रकारांचे काय ? कोण लढणार यांच्यासाठी ? आता तुम्हला 'तरुण भरत'च्या  मुंबई ऑफिसमधील काही सत्य घटना एकूण मराठी माणसाचा आणि मराठी पत्रकार संघटनाचे रक्त पेटून उठेल पण ते ऐकतील आणि विसरून जातील हे मी दाव्याने बोलू शकतो. 

Friday 10 April 2015

जर्नलिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रच्या स्मरणिकेचे प्रकाशन

जर्नलिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रच्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्याचे माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.  यावेळी संचालक शिवाजी मानकर, अनिरुद्ध अष्टपुत्रे, युनियनचे राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ, युनियनचे मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव, ठाणे अध्यक्ष सतीश साटम, मुंबई महानगर पालिका युनिटच्या राधिका यादव,मीरा भाईंदर युनिटचे नामदेव काशीद,मुबई चिटणीस मुकेश धावडे, मुकीम शेख उपस्थित होते.     

Thursday 9 April 2015

महिला पत्रकाराला लुटण्याचा प्रयत्न

ठाणे : रेल्वे स्थानक परिसरात महिलांचा विनयभंग व सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत असतानाच पुन्हा एकदा लोकलमधून रात्री प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनीषा गुरव (३५) ही महिला पत्रकार रात्रीच्या वेळी सेकंड क्लास महिला डब्यातून प्रवास करत असताना कळवा स्थानकादरम्यान एका चोरट्याने त्यांचा मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करत असताना चोरट्याने गुरव यांना फरफटत दारावरच्या पोलपर्यंत आणले. या घटनेमुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.

Saturday 4 April 2015

डिस्कव्हरी चॅनेलच्या तोतया पत्रकाराला अटक

मुंबई : डिस्कव्हरी चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगून भाड्याने महागडे कॅमेरे, लेन्स घेऊन लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या तोतयाला सायन पोलिसांनी हिमाचल प्रदेश येथून अटक केली आहे. 

गुटखा भरलेला टेम्पो अडवून १0 लाख मागणारे तोतये पत्रकार गजाआड

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुटखा भरलेला टेम्पो अडवून चालकाकडे १0 लाख रुपये मागणारे तोतये पोलीस व पत्रकारांच्या ९ जणांच्या टोळीला मनोर पोलिसांनी शिताफीने पकडून गजाआड केले. तसेच बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणार्‍या टेम्पोचालक-मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे.

Thursday 2 April 2015

जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीला जय महाराष्ट्र करताना कार्यकारी संपादक शैलेश लांबे यांनी सहकाऱ्याना लिहिलेले निरोपाचे भावनीक पत्र .......

निरोपाचं पत्र
माझ्या सहकाऱ्यांनो,
गेल्या १६ महिन्यांपासून मी तुमच्यासोबत काम करतोय. एका राष्ट्रीय वाहिनीचा अनुभव गाठीशी घेऊन मी मराठीमध्ये आलो होतो ते काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी. मी माझ्या परीने प्रयत्न केले. थोडीशी आक्रमकता आणून वेग वाढवण्यासंदर्भात काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत अनेकांची मनं दुखावली. पण चॅनलचं भवितव्य आणि चॅनलची प्रतिमा उंचावण्यासाठी मी हे प्रयोग केले होते. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मुळात बोटावर मोजण्याईतक्याच व्यक्तींना मी ईथे ओळखत होतो. मराठी चॅनल्सच्या लिस्टमध्ये आपण समाधानकारक स्थान मिळवावं अशी माझी ईच्छा होती.

पत्रकारिता के क्षेत्र में गिरावट क्यों ( पत्रकार बदनाम क्यों )

बदलते समय और बदलती सोच के साथ पत्रकारिता के क्षेत्र मेंदिन प्रतिदिन गिरावट आ रही है इस मुद्दे पर आज देश में  गर्मा गरम बहस भी छिड चुकी है। देश के लोकतंत्र का मजबूत चौथा स्तम्भ कहा जाने वाला पत्रकारिता का क्षेत्र भी अब इस भ्रष्टाचार से अछूता नही रहा। आज पैसे की चमक ने पत्रकारिता के मिशन को व्यवसाय बना दिया। ये ही कारण है कि आज देश में भ्रष्टाचार के कारण हाकाहार मचा है। मंहगाई आसमान छू रही है। राजनेता, अफसर देश को लूटने में लगे है और गुण्डे मवाली, सफेद खददर में संसद भवन में पिकनिक मना रहे है। पूंजीपतियो, राजनेताओ, अफसरो के बडे बडे विज्ञापनो ने पैसे के बल पर आज मीडिया के जरिये आम आदमी की समस्या और उस की उठने वाली आवाज को दबा कर रख दिया गया है।

निर्भीड पत्रकार घडवण्याचे 'चौथा स्तंभ'चे काम स्तुत्य - देसाई

मुंबई : जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना वाचा फोडण्याची महत्त्वाची भूमिका पत्रकारांना बजावावी लागते. त्यासाठी चौथा स्तंभ संस्थेने पुढाकार घेतला असून असे निर्भीड व तडफदार पत्रकार बनवण्याचे हे त्यांचे कार्य स्तुत्य असेच आहे, असे गौरवोद्गार माजी नगरसेवक परशुराम (छोटू) देसाई यांनी काढले. दादर येथील स्नेहलता राणे गर्ल्स हायस्कूल येथे चौथा स्तंभ संस्थेचा दहावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळेस देसाई बोलत होते.