Thursday 30 July 2015

परभणी पत्रकार भवनाच्या कमर्शियल वापराला दणका -

पत्रकार भवन डीआयओच्या ताब्यात - जिल्हाधिकार्यांचा आदेश
ए.आर.अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यातील प्रत्येक जिल्हयात पत्रकार  भवन बांधण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी शासनाने भूखंड आणि निधी देण्याचंही ठरलं.त्याचा लाभ बहुतेक जिल्हयांना झाला. आज राज्यातील जवळपास पंचवीस जिल्हयात पत्रकार भवनाच्या इमारती उभ्या आहेत.जागा देताना जिल्हा पत्रकार संघाला त्या दिल्या गेल्या.मात्र काही जिल्हयात पत्रकार एवढे हुशार निघाले की,त्यानी परस्पर पत्रकार भवनाचे वेगळे  ट्रस्ट स्थापन  केले आणि त्यावर आपली वर्णी लावून घेतली. म्हणजे जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीत आपला पराभव झाला किंवा कोणत्याही कारणानं जिल्हा पत्रकार संघ आपल्या ताब्यातुन गेला तरी पत्रकार भवन मात्र आपल्याच ताब्यात राहिले पाहिजे अशी ही योजना होती. 

Saturday 25 July 2015

पत्रकार संरक्षण कायदा प्रारुप महिन्यात तयार करणार - गृहराज्यमंत्री राम शिंदे


मुंबई, दि. २४ :- राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले तसेच त्यांच्या हत्या रोखण्यसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषद सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला मोठे यश मिळाले असून पत्रकार संरक्षण आणि हल्लाविरोधी कायद्याचे प्रारुप एक महिन्यात तयार करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सभागृहात दिले. यामुळे पत्रकार संरक्षणविषयक कायदा निर्मितीची प्रक्रिया एका निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे.

पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा महिनाभरात - मुख्यमंत्री

मुंबई,दिनांक 23 ( प्रतिनिधी) पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक असून एका महिन्याच्या आत पत्रकार संरक्षण कायद्याच्या मसुद्यास मूर्त स्वरूप देण्यात येईल असे आश्‍वासन मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळास दिले.एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्र्याशी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात जवळपास तासभर चर्चा करून पत्रकार संरक्षण कायद्याची जोरकस मागणी केली.आता चर्चा,समित्या नको,आता थेट निर्णय घ्या,असा आग्रह धरतानाच आम्ही चुकीच्या पध्दतीनं पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांसाठी संरक्षण मागत नाहीत ही बाबही एस.एम.देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केली.

Friday 24 July 2015

मुंबईत पत्रकारांना घर मिळावे अशी योजना तयार करावी - आमदार अॅड. आशिष शेलार

मुंबईत पत्रकारांनाही सवलतीच्या दरात घर देण्यासाठी शासनाने योजना तयार करावी अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलावण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

Monday 20 July 2015

पत्रकार संरक्षण कायदा लवकरच मंजूर करा !...महाराट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) :- पत्रकार संरक्षण कायदा लवकरच मंजूर करु, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळास दिले.

प्रसार माध्यमांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे - मुख्यमंत्री

अमरावती : समाजातील वास्तव परिस्थिती मांडून शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य कसे फुलेल अशा सकारात्मक दृष्टीकोनातून प्रसार माध्यमांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

पत्रकारांनी शासन व जनता यातील सेतू होऊन लोकशाही समृद्ध करावी - मुख्यमंत्री

अमरावती : लोकशाहीच्या चारही स्तंभांवर आज विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह उभे आहे. लोकशाही संक्रमण अवस्थेतून जात आहे. अशा काळात पत्रकारांनी शासन व जनता यातील सेतू होऊन लोकशाही समृद्ध करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

पत्रकार दुबे हत्येप्रकरणी उपअधीक्षकांच्या निलंबनाची मागणी

भाईंदर : मीरा रोड येथील पत्रकार दुबे यांच्या हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका असलेले पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांना निलंबित करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

महिला पत्रकाराचा विनयभंग करणार्‍या रिक्षाचालकाला अटक

मुंबई : एका महिला पत्रकाराचा कथितपणे विनयभंग करणार्‍या ४0 वर्षीय रिक्षाचालकाला रविवारी अटक करण्यात आली. आरोपी रमेश कुमार त्रिलोदर याला विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याच्या एका पथकाने कुर्ला येथून ताब्यात घेतले. 

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा झालाच पाहिजे - रामदास आठवले

मुंबई : महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यात चिंतनीय वाढ झाली आहे.पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारांचे संरक्षण करणे शासनाचे काम असून पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण पाहता पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालाच पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली आहे.

Thursday 16 July 2015

मंत्रालय आणि विधिमंडळातील पत्रकारांना आवाहन

मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, वृत्तसंस्थांचे, साप्ताहिकांचे अधिस्विकृतीधारक व इतर पत्रकार, छायाचित्रकार, क्यामेरामन यांनी नोंदणीकृत "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ" या संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

Sunday 12 July 2015

"मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ" जर्नलिस्ट्स युनियनच्या ताब्यात

विविध शासकीय कार्यालयात प्रथा परंपरेनुसार संबंधीत बिटचे वृत्तसंकलन कारणाऱ्या पत्रकारांचे वार्ताहर संघ चालतात. असे प्रथा परंपरे नुसार चालू असलेल्या वार्ताहर संघाची नोंदणीच करता येत नाही असे सांगितले जात होते. नोंदणीकृत नसलेले वार्ताहर संघ चालवून काही मोजक्या पत्रकारांचा स्वार्थ जपला जात होता. अशी परस्थिती सर्वच शासकीय कार्यालयातील पत्रकार संघटनांची असताना "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" या संघटनेने मंत्रालय आणि विधीमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांची संघटना असलेल्या "मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ" या पत्रकार संघटनेची नोंदणी करून हि संघटनाच आपल्या ताब्यात घेतली आहे.

Monday 6 July 2015

पत्रकार मंत्र्यापेक्षा मोठा आहे का?- विजयवर्गीय

भोपाळ - व्यापमं गैरव्यवहारात मध्य प्रदेशातील भाजपचे शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले असतानाच,  पत्रकार अक्षय सिंग याच्या मृत्यूनंतर भाजपचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकार हा मंत्र्यापेक्षा मोठा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सह्याद्री वाहिनीची ‘दुरवस्था’

मुंबई / अनुजा चवाथे
एकेकाळी मराठीजनांचे सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या, कल्पकतेने कार्यक्रम सजवून सादर करणाऱ्या दूरदर्शनच्या सह्याद्री या मराठी वाहिनीची सध्या पुरती दुरवस्था झाली आहे. डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवांच्या जमान्यात ही वाहिनी कोणत्या क्रमांकावर ​दिसते याची गंधवार्ताही बहुतेकांना नसून, खासगी मनोरंजन वाहिन्यांच्या टीआरपीच्या शर्यतीतही ही वाहिनी खालच्या क्रमांकावर गटांगळ्या खाताना दिसते आहे.

Thursday 2 July 2015

13 जुलै रोजी पत्रकारांचे एसएमएस आणि घंटानाद आंदोलन

मुंबई दिनांक 1 जुलै ( प्रतिनिधी) उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये पत्रकारांच्या झालेल्या निघृण हत्त्या आणि महाराष्ट्रातील पत्रकारांवर दररोज होत असलेले जीवघेणे हल्ले याचा निषेध करण्यासाठी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा या मागणीसाठी राज्यातील पत्रकार येत्या 13 जुलै रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करून पत्रकारांच्या प्रश्‍नांकडं दुर्लक्ष कऱणार्‍या राज्य सरकारबद्दलचा आपला तीव्र संताप व्यक्त करतील. त्याचबरोबर 13 जुलै रोजी  राज्यभरातून हजारो पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांना  एसएमएस करून "पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे" या मागणीचा आग्रह धरतील.30 जून रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती  समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

Wednesday 1 July 2015

दै.गांवकरीच्या कर्मचार्‍यांचे वेतन न मिळाल्याने लेखणी बंद आंदोलन

औरंगाबाद येथील दै.गांवकरीच्या कर्मचार्‍यांचे मागील काही वर्षांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करत कामगार उपायुक्तांना निवेदन दिले. 

प्रति,
मा.कामगार उपायुक्त,
कामगार उपायुक्त कार्यालय,
औरंगाबाद
विषय : कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाबाबत. 

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे पुरस्कार प्रदान

मुंबई : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा यंदाचा कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार 'लोकमत'चे संपादक राजाभाऊ माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दै. 'प्रहार'चे शैलेंद्र शिर्के, 'सकाळ'चे ज्ञानेश चव्हाण, 'एबीपी माझा'चे विलास बढे, सचिन देसाई यांना पत्रकार भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.