Thursday 29 January 2015

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्य शासनाचे लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी, विजय विश्वनाथ कुवळेकर तसेच दिनकर केशव रायकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. यासोबतच गेल्या तीन वर्षांतील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे होणार आहे.

Wednesday 28 January 2015

अब फर्जी पत्रकार जाएंगे जेल……

समाजसे धोखाधडी करने वाला हर कोई अपराधी है उनमे से फर्जी पत्रकारोंने समाज और प्रशासन को परेशान करके रखा है। फर्जी पत्रकारोंकी बढ़ती संख्याके कारण उनके ऊपर कड़ी कारवाही करनेका आदेश महाराष्ट्र पुलिस को दे दिया है। 

आर. के. लक्ष्मण यांचे यथोचित स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

पुणे : आर. के. लक्ष्मण हे देशाचे वैभव होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या प्रतिभाशक्तीने त्यांनी रेखाटलेला 'कॉमन मॅन' हा जगाच्या शेवटापर्यंत जिवंत राहील. राज्य सरकारदेखील त्यांच्या कलेची दखल घेऊन ती जतन करता यावी, यासाठी योग्य ते स्मारक निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण करताना आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे ही समाजाला कायम मार्गदर्शक असतील. आपल्या व्यंगचित्रांमधून कायम सत्याची कास धरणार्‍या आर. के. यांच्या जाण्याने अतीव दु:ख होत असल्याचे फडणवीस म्हणाले.  

Tuesday 27 January 2015

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी (२६ जानेवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Friday 23 January 2015

खबर हटवाने के लिए पुलिसने वेबसाईटको जारी किया नोटिस

नई दिल्ली: उत्तर प्रदेश पुलिस ने 2011 में प्रकाशित एक खबर को हटवाने के लिए द्विभाषीय खबरी वेबसाईट http://twocircles.net यानि TCN को कानूनी नोटिस भेजा है. 2011 में वेबसाईट पर छपी इस खबर में महाराष्ट्र पुलिस में महिला कॉन्स्टेबल प्रशिक्षुओं के प्रशिक्षण के दौरान गर्भवती हो जाने का ज़िक्र है. 20 जनवरी 2014 को जारी इस नोटिस में उत्तर प्रदेश पुलिस ने कहा है कि उन्हें किसी से शिक़ायत मिली कि कोई पुलिस विभाग के सम्मान के साथ खिलवाड़ कर रहा है और वेबसाईट पर विभाग के सन्दर्भ में तथ्यहीन, आधारहीन, झूठी और अपमानजनक खबर छापी गयी हैं.

Wednesday 21 January 2015

"आज तक"चे सीइओ उत्तर प्रदेश विधानसभा समिती पुढे हजर

स्टिंग ऑपरेशनची चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा समिती पुढे मंगळवारी "आज तक" न्यूज च्यानेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीइओ ) यांनी हजेरी लावून समिती सदस्यांच्या प्रश्नांचा सामना केला.

मजीठिया वेज बोर्ड की लड़ाई लड़ने को 250 मीडियाकर्मी तैयार

जी हां. करीब ढाई सौ मीडियाकर्मियों ने भड़ास के साथ मिलकर अपना हक पाने के लिए मजीठिया वेज बोर्ड की लड़ाई लड़ने हेतु भड़ास के पास मेल किया है. जिन-जिन ने मेल किया, उन सभी एडवोकेट उमेश शर्मा का एकाउंट नंबर और अथारिटी लेटर भेज दिया गया है. सिर्फ छह हजार रुपये देकर घर बैठे अपने हक की लड़ाई लड़ने के भड़ास के इस अनूठे पहल का देश भर में स्वागत किया जा रहा है.

बदलत्या काळात नीतिमूल्ये पाळण्याची जबाबदारी पत्रकारांवर - गिरीष बापट

वर्तमानपत्रांत छापून येणार्‍या बातम्यांवर समाज आजही डोळे झाकून विश्‍वास ठेवत असतो. वर्तमानपत्रांत जे छापून येते ते खरेच असते, असा जनतेचा विश्‍वास असतो. जनतेचा हाच विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी जो बातमी देतो तो पत्रकारही खराच असला पाहिजे. बदलत्या काळात नीतिमूल्ये पाळण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर आहे. प्रकाश बाळ जोशी हे नव्या पत्रकारांसाठी त्या बाबतीत आदर्श असेच आहेत, अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी प्रकाश जोशी यांचा गौरव केला.

Friday 16 January 2015

मजीठिया वेज बोर्ड - भड़ास आर-पार की लड़ाई के लिए तैयार

Yashwant Singh : अखबार मालिक अपने मीडियाकर्मियों को मजीठिया वेज बोर्ड के हिसाब से सेलरी, एरियर नहीं दे रहे हैं. जो-जो मीडियाकर्मी सुप्रीम कोर्ट गए, उनके सामने प्रबंधन झुका और उनको उनका हक मिल गया. पर हर मीडियाकर्मी सुप्रीम कोर्ट तो जा नहीं सकता. इसलिए भड़ास ने सुप्रीम कोर्ट के एक धाकड़ वकील Umesh Sharma को अपना वकील नियुक्त किया और देश भर के मीडियाकर्मियों का आह्वान किया कि अगर वो मजीठिया वेज बोर्ड के हिसाब से अपना हक सेलरी एरियर चाहते हैं तो सिर्फ मुझे एक निजी मेल कर दें, अपना नाम पता अखबार का नाम अपना पद अखबार का एड्रेस मोबाइल नंबर मेल आईडी आदि देते हुए. अब तक सैकड़ों मेल मिल चुके हैं.

Wednesday 14 January 2015

वृत्तपत्रांकडून मजिठीया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी नाहीच

सरकारने किंवा इतरांनी न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत म्हणून टीकेची झोड उठवणारी, स्वतःला लोकशाहीचा चौथा खांब म्हणवणारी वृत्तपत्रे स्वतःच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळत नसल्याचे उघड झाले आहे. बेरक्याच्या हाती पडलेल्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी आपल्या पत्रकारांना / कामगारांना नियमाप्रमाणे जास्त पगार द्यावा लागेल म्हणून मजिठीया आयोगाची अंमलबजावणीच केलेली नाही. मजिठीया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीच केली गेली नसल्याने पत्रकार / कामगारांना अद्याप पगारवाढ आणि सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत.

Tuesday 13 January 2015

जागृती वाहिनीचे मुंबई ब्युरो चीफ म्हणून शशिकांत सांडभोर रुजू

महाराष्ट्रात नव्यानेच सुरु झालेल्या "जागृती" मराठी न्यूज च्यानेलचे मुंबई ब्युरो चीफ म्हणून सामाजिक चळवळीची जाण असलेले धडाडीचे पत्रकार शशिकांत सांडभोर यांची नियुक्ती झाली आहे. सांडभोर हे नुकतेच आपल्या पदावर रुजू झाले आहेत.

Monday 12 January 2015

फ्रान्सनंतर र्जमनीतील प्रसारमाध्यमावर हल्ला

बर्लिन : फ्रान्सच्या 'चार्ली हेब्डो' साप्ताहिकातील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे आपल्या दैनिकात पुन्हा प्रकाशित करणार्‍या र्जमनीच्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर रविवारी हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या आणि पेटते बोळे आत फेकून कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. 

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा सत्कार

मुंबई : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड़ रावसाहेब शिंदे होते. या वेळी आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते.

Thursday 8 January 2015

पॅरिसमध्ये व्यंगचित्र साप्ताहिकावर दहशतवाद्यांचा हल्ला - १० पत्रकारांसह १२ ठार

पॅरिस (वृत्तसंस्था) - दहशतवाद्यांच्या क्रूर हत्याकांडाने जग पुन्हा हादरले आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिक ‘चार्ली एब्दो’च्या कार्यालयावर बुरखाधारी दोन दहशतवाद्यांनी ‘अल्ला हो अकबर’चा नारा देत बेछूट गोळीबार आणि रॉकेट लॉंचर डागून भयंकर हल्ला केला. यात साप्ताहिकाचा संपादक स्टिफन चार्बोनियरसह दहा पत्रकार, दोन पोलीस ठार झाले असून दहाजण जखमी आहेत. महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र साप्ताहिकामध्ये छापल्यामुळे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर फ्रान्ससह जगभरात प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 

Wednesday 7 January 2015

डोंबिवली पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर

डोंबिवली पत्रकार संघाची सन २०१४-२०१५ ची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी श्रीराम कांदू ( पुण्य नगरी ) , उपाध्यक्ष पदी विकास काटदरे ( सामना ) , सरचिटणीस पदी अजय निक्ते ( पुढारी ) तर कोषाध्यक्षपदी प्रशांत जोशी ( मुंबई तरूण भारत ) यांची निवड करण्यात आली आहे. 

स्तंभलेखक, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर नेवगी यांचे निधन

मुंबई : दै. 'पुण्य नगरी'चे स्तंभलेखक आणि 'कोटीश्‍वर' या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर यांचे पुणे येथील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने सोमवारी रात्री ११ वाजता निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी पत्रकारितेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंत्रालय वार्ताहर संघाचा पत्रकारिता पुरस्कार प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर

प्रतिष्ठेचा मानला जाणारा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा या वर्षीचा पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, जागतिक कीर्तीचे कलावंत प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची पत्रकार दिनाचे औचित्य साधून वार्ताहर संघाने अधिकृत घोषणा केली. लवकरच या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मानखुर्द येथे पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मुंबई क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार, ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील पीएमजी कॉलनी मानखुर्द येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Sunday 4 January 2015

माध्यमांनी आरोप न करता अभ्यासपूर्ण टीकाकाराची भूमिका बजावावी - पंतप्रधान

कोल्हापूर : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी केवळ आरोप न करता अभ्यासपूर्ण टीकाकाराची भूमिका बजावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे बोलताना केले. ते येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित दैनिक पुढारीच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. 

पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

11 जानेवारी रोजी सर्व माध्यमातल्या पत्रकारांसाठी टी. व्ही. जर्नालिस्ट असोशिएशननं संपूर्ण बॉडी चेकअप शिबिराचं आयोजन केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स असो कि प्रिंट, हिंदी असो की मराठी किंवा सर्व भाषिक पत्रकार, वत्तवाहिन्यात, न्युजपेपरमध्ये काम करणारे कोणीही यात सहभागी होउ शकतात. आपण स्वतः, आपली पत्नि, आई वडील यांच्या चेकअपसाठी हे शिबिर होणार आहे. 

मुंबईत पत्रकारांसाठी कार्यशाळा

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने दोन दिवसीय कार्यशाळा 6 व 7 जानेवारी रोजी कुर्ला (पश्चिम) येथील कुर्ला कोर्टाजवळ असलेल्या मंडळाच्या संकुलात आयोजित केली आहे.या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2015 या दिवशी सकाळी 10 वाजता होईल.

Thursday 1 January 2015

नव जागृती (मराठी) न्यूज चॅनलचे बुलेटिन सुरू...

स्वत:ला नामवंत, ग्रेट समजणाऱ्या आणि पॅकेज मागणा-या प्रस्थापितांना न घेता होतकरू, गुणवंत आणि कष्टाळू यंग ब्रिगेड घेवून जागृतीचे चेअरमन राज गायकवाड,व्हॉईस चेअरमन राहूल भार्गव, मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी नव जागृती (मराठी) न्यूज चॅनल सुरू केले आहे.