Friday 27 February 2015

ज्येष्ठ पत्रकार इसाक मुजावर यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक व पत्रकार इसाक मुजावर (वय 81) यांचे आज ( २६ फेब्रुवारी २०१५ ) दुपारी नवी मुंबईतील नेरूळ येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुजावर यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई आणि नातवंडे आहेत. 

Tuesday 24 February 2015

पत्रकार पेन्शन योजना केवळ पन्नास-साठ पत्रकारांसाठीच करायचीय का ? - एस.एम. देशमुख

मुंबई - मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.अध्यक्ष चंदन शिरवाळे यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या गेलेल्या या भेटीत स्वाभाविकपणे पत्रकारांच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे बातमीत म्हटले आहे.जेव्हा जेव्हा पत्रकारांचे एखादे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटते तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रश्नाबद्दल सरकारकडून अशीच सहानुभूती दाखविण्याची परंपरा आहे.त्यामुळे सरकारने एखादे आश्वासन दिल्यानंतर आपण सावधपणेच त्याकडे पाहिले पाहिजे. काऱण पाच वर्षापूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याचे आश्वासन किमान शंभर चॅनलच्या कॅमेऱ्यांसमोर दिले होते.नंतर या आश्वासनाचे काय झाले ते आपण बघतोच आहोत.पत्रकार पेन्शनचा मुद्दाही असाच टोलवा टोलवीचा झालेला आहे. 

राज ठाकरे दैनिक "मराठा" सुरु करणार

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार आहेत. राज यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत याबाबत प्रथमच माहिती दिली असून येत्या काही महिन्यांत राज हे 'संपादक' या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. राज यांच्या नव्या दैनिकाचे नाव 'मराठा' असेल असेही सूत्रांनी सांगितले. राज यांच्या नव्या दैनिकाचे नाव 'मराठा' असणार आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांच्याकडून या नावाचे कायदेशीर हक्क आधीच राज यांनी मिळवलेले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. हे दैनिक मुंबई महापालिकेच्या निवडणुकांआधी सुरू होईल, मात्र नेमका मुहूर्त अद्याप सांगता येणार नाही, असे सूत्रांनी पुढे स्पष्ट केले.

Thursday 19 February 2015

रायगड प्रेस क्लबच्या पुरस्कारांची घोषणा

रायगड प्रेस क्लबच्या सन २०१५ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आचार्य अत्रे  राज्यस्तरिय युवा संपादक पुरस्कार मंदार फणसे यांना तर राजन वेलकर यांना स्व. प्रकाश काटदरे निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.

Tuesday 17 February 2015

‘आमचं विद्यापीठ’ कि दर्डांची 'टिमकी' ?

‘लोकमत’मधील चाकरमाने पत्रकार अतुल कुळकर्णी संपादित ‘आमचं विद्यापीठ’ हे पुस्तक व्यक्तीस्तोम आणि मस्काबाजीचे बटबटीत उदाहरण आहे! यातील विद्यापीठ म्हणजे ‘लोकमत’च्या मालकांपैकी एक असलेले राजेंद्र दर्डा आहेत. त्यांनी लोकमत हे वृत्तपत्र या भागात अतिशय उत्तमपणे संघटित केले असले आणि त्यांच्यातील व्यवस्थापकीय कौशल्याबद्दल दुमत नसले तरीही ‘पत्रकारितेचे विद्यापीठ’ हा त्यांचा या पुस्तकातील लेखक आणि संपादकांकडून करण्यात आलेला गौरव पूर्णपणे अनाठायी, अप्रस्तुत आणि मराठी पत्रकारितेतील मान्यवरांचा उपमर्द करणारा आहे.

Saturday 14 February 2015

तरुण भरतनी दिल अन कर्माने गेल

आपल्या कामाच्या जोरावर न मिळविनारा माणूस आपला काहीतरी चांगला व्हाव यासाठी देवाकडे विविध नवस करतो. आणि नशीब असला तर ते त्याला मिळते. मात्र ते टिकवता आले पाहिजे. ते सांगतात ना 'अल्ला मेहरबान तो गधा पैहलवान' तसेच प्रकार तरुण भरतच्या मुंबई कार्यालयात घडले आहेत. 

Friday 13 February 2015

माध्यमांत ’मॉलसंस्कृती’ येेेऊ नये म्हणून जागरूक राहण्याची गरज - रविराज गंधे

नाशिक (प्रतिनिधी) : ’’माध्यमांतील सामाजिक जाणीव हरपत चालली असून नव्या जगतातील पत्रकारांनी माध्यमांत ’मॉलसंस्कृती’ येेेऊ नये यासाठी पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी जागरूक राहण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन सह्याद्री वाहिनीचे निर्माते रविराज गंधे यांनी केले. ’महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार’ संघाच्या जिल्हा शाखा आणि ’दै. मुंबई तरुण भारत’तर्फे आयोजित सामाजिक उपक्रमात माध्यमांची भूमिका या विषयावर दि. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. 

ज्येष्ठ सिने पत्रकार बोणे बंधूंचा सत्कार

मुंबई : ज्येष्ठ सिने पत्रकार पी. के. बोणे ऊर्फ बोणे बंधू यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 'आपला चौथा स्तंभ' संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक विजय कोंडके, निर्माता नंदकुमार विचारे उपस्थित राहणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात २0 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती 'आपला चौथा स्तंभ'चे अध्यक्ष विजयकुमार बांदल यांनी पत्रकारांना दिली. 

Thursday 12 February 2015

मुंबईमध्ये शिवसेना नगरसेवकाची पत्रकारांना धमकी

बातमी वाचण्यासाठी खालील बातमीवर क्लिक करा

उर्दू दैनिकाच्या संपादिकेस दिलासा

मुंबई : फ्रान्समधील 'चार्ली हेब्डो' साप्ताहिकात छापण्यात आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राची पुन:प्रसिद्धी करून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या उर्दू दैनिकाच्या संपादिकेला उच्च न्यायालयाने आणखी दिलासा दिला आहे. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी संपादिकेस १७ फेब्रुवारीपर्यंत अटक करता येऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

Wednesday 11 February 2015

पत्रकारांसाठी कार्यशाळेचे ( रिफ्रेशिंग कोर्सचे ) आयोजन

नव्या तंत्रज्ञानाच्या गतिमानतेमुळे प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीत कमालीचा बदल झाला आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याबरोबरच अपडेट राहणे अपरिहार्य झाले आहे. बदलत्या परिस्थितीत पत्रकारांना अपडेट राहता यावे म्हणून 'मिडिया फॉर पिपल' आणि 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ फेब्रुवारी २०१५ रोजी आंतरभारती भवन, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे पत्रकारांसाठी कार्यशाळेचे (रिफ्रेशिंग कोर्स) आयोजन करण्यात आले आहे.

Tuesday 10 February 2015

'त्या' उर्दू दैनिकाच्या संपादिकेला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : फ्रान्समधील 'चार्ली हेब्डो' साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर छापण्यात आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राची पुन:प्रसिद्धी करून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या उर्दू दैनिकाच्या संपादिकेला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. मुंब्रा येथील उर्दू दैनिक 'अवधनामा'च्या संपादिका शिरीन दळवी यांच्यावर ११ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकार व पोलीस खात्याला दिले. दळवी यांनी स्वत:विरोधातील गुन्हे रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Sunday 8 February 2015

मीडियाकर्मियोंने मजीठिया वेज बोर्ड के लिए सुप्रीम कोर्ट में दायर की याचिका

प्रिंट मीडिया के कर्मियों को मजीठिया वेज बोर्ड की सिफारिशों के अनुरूप सेलरी न दिए जाने को लेकर सुप्रीम कोर्ट में याचिका दायर करने की आखिरी तारीख को भड़ास की पहल पर 117 मीडियाकर्मियों ने अपने नाम पहचान के साथ खुलकर याचिका दायर की. इन सभी 117 मीडियाकर्मियों की तरफ से याचिका तैयार करने और फाइल करने का काम किया सुप्रीम कोर्ट के वरिष्ठ वकील उमेश शर्मा ने. भड़ास से एक वीडियो इंटरव्यू के दौरान एडवोकेट उमेश शर्मा ने इस पूरे मामले पर विस्तार से जानकारी दी जिसे आप इस वीडियो लिंक पर क्लिक करके देख सुन सकते हैं... वीडियो इंटरव्यू का यूट्यूब लिंक ये रहा...  https://www.youtube.com/watch?v=eD2o8_sFWAQ 

दूरदर्शन और आकाशवाणी पर भी आएगी ब्रेकिंग न्‍यूज

दूरदर्शन और आकाशवाणी का कलेवर अब बदलने जा रहा है। निजी समाचार चैनलों की तरह अब इसमें भी ब्रेकिंग न्‍यूज दिखाई और सुनाई जाएगी। कोशिश रहेगी कि ब्रेकिंग न्यूज निजी समाचार चैनलों से पहले चल जाए। इसके लिए सरकारी प्रसार भारती सरकारी मंत्रालयों पर निर्भर होगी। प्रसार भारती के प्रमुख ने सचिवों से कहा है कि सरकारी मंत्रालयों की खबरें सार्वजनिक होने से नहले दूरदर्शन और ऑल इंडिया रेडियो को एडवांस में दी जाएं।

जिंतूर तालुक्यात पत्नीसह पत्रकारावर हल्ला

परभणी: महाराष्ट्रात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्लयाच्या घटना नव्या वर्षात देखील थांबायचं नाव घेत नाहीत.जानेवारीत सात पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडयात परभणी जिल्हयातील जिंतूर तालुक्यातील बामणी येथील पत्रकार राजू देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गावगुंडांनी हल्ला चढविला.एका सत्कार समारंभात झालेल्या तुंबळ भांडणाचे नावासह वार्तांकन केल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.शुक्रवारी रात्री काही गावगुंड आठच्या सुमारास राजू देशमुख यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसहा राजू देशमुख यांच्यावर हल्ला केला.केवळ बातमी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.

अखेर ‘सामना’ने मागितली नारायण राणे यांची माफी

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चारित्र्यहनन केल्या प्रकरणी दै. ‘सामना’ने शुक्रवारी ( ६ फेब्रुवारी ) त्यांची बिनशर्त माफी मागितली. १० जुलै २००५ ते २६ सप्टेंबर २००६ या कालावधीत राणे यांच्या विरोधात सतत मानहानीकार वृत्त ‘सामना’तून प्रसिद्ध केले जात होते. त्याविरोधात राणे यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. न्यायालयात झालेल्या समझोत्यानुसार ‘सामना’ने अखेर माफीनामा जाहीर केला. 

पत्रकारांबाबत सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत

मुंबई - पत्रकार पेन्शन योजना,आणि पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे स्वागत केले आहे. 

Friday 6 February 2015

महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता विद्यापीठ”सुरु करा - जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र

मुंबई / http://jumpress.blogspot.in मधून साभार 
पत्रकारितेतील अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी,पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्याना तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराना उच्च शिक्षणाची संधी निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये,वृत्तपत्र सृष्ठीचे आध्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने “ पत्रकारिता विद्यापीठ “सुरु झाले पाहिजे अशी मागणी जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

वादग्रस्त मजकुराबद्दल पेपर विक्रेत्याला दोष का ?

मुंबई : पॅरिसमधील 'चार्ली हेब्डो' या व्यंगचित्र साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र छापल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या मुंब्य्रातील 'अवधनामा' या उर्दू दैनिकाची विक्री करणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे. दैनिकातील वादग्रस्त मजकुराबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांना जबाबदार का धरायचे? असा सवाल उपस्थित करत शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Thursday 5 February 2015

अपने मीडियाकर्मियों को ठेकेदार का आदमी बताकर बाहर निकाल रहा है अमर उजाला प्रबंधन!

अमर उजाला ने मजीठिया के डर से कर्मचारियों को ठेकेदार का कर्मचारी बताकर बाहर का रास्ता दिखाना शुरू कर दिया है। अभी तक यह खेल पीटीएस डिपार्टमेंट में शुरू किया गया है, लेकिन विश्वस्त सूत्रों से पता चला है कि यह नियम जल्द ही संपादकीय विभाग में भी लागू कर दिया जाएगा। पिछले साल मई महीने में मजीठिया वेज बोर्ड का लेटर बांटने के बाद अखबार प्रबंधन कुछ ऐसी नीतियां अपना रहा है ताकि उसे मजीठिया वेज बोर्ड के नाम पर धेला भी न देना पड़े। कुछ महीने पहले माहेश्वरी परिवार के खासमखास बताए जाने वाले और मजीठिया वेज बोर्ड के हिसाब किताब करने वाले एचआर प्रमुख को भी बाहर का रास्ता दिखा दिया गया है।

पत्रकारांना निवृत्तीवेतन योजना सुरू करणार - मुख्यमंत्री

मुंबई : माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. चारही स्तंभ बळकट राहिल्यानेच लोकशाही सशक्त होण्यास मदत होत असते. मात्र हे करत असताना पत्रकारही माणूसच असतो. त्यालाही सामाजिक सुरक्षा लाभली तर तो अधिक चांगले कार्य करू शकतो म्हणून पत्रकारांना राज्य सरकारतर्फे निवृत्तीवेतन देण्याची योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकार संरक्षण कायद्याचाही निश्‍चितच विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले.राज्य सरकारच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

Tuesday 3 February 2015

ज्येष्ठ पत्रकार वसंत प्रधान यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार वसंत प्रधान यांचे मुंबईतील खार येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी अँड़ किसन, कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती निशिता म्हात्रे आणि याले विद्यापीठातील शास्त्रज्ञ दीप्ती प्रधान या दोन कन्या, मुलगा संगीतकार अनीश आणि स्नुषा शुभा मुद्गल असा परिवार आहे. 

Monday 2 February 2015

राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी पद्माकर देशपांडे यांची, तर कार्याध्यक्षपदी हेमंत चंद्रात्रे यांची निवड झाल्याचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी जाहीर केले आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

मुंबई - मंत्रालयामध्ये मोजक्या प्रस्तापीत पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या" सन 2015 साठी पार पडलेल्या निवडणूकीत अध्यक्ष पदी दैनिक पुढारीचे चंदन शिरवाळे,  ऊपाध्यक्ष पदी दै. मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे, कार्यवाहपदी दिव्य मराठीचे चंद्रकांत शिंदे तर कोषाध्यक्ष पदी पीटीआयच्या मनिषा रेगे निवडून आले आहेत. 

अब अंबानी सिखाएंगे पत्रकारिता

रिलायंस और टीवी 18 मीडिया हाऊस की ओर से 30 जनवरी को छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री रमन सिंह के साथ पत्रकारिता सीखाने का एक समझौता हुआ है। रमन सिंह की उपस्थिति में यह समझौता छत्तीसगढ़ के कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता विश्वविद्यालय ने किया है। यानि अब इस विश्वविद्यालय में मुकेश अंबानी की नीति के अनुरूप युवाओं को पत्रकारिता सिखाई जाएगी।